व्हॉट्सअॅप स्टेटसवर महात्मा फुले दांपत्यांचा अवमान; पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत व्हॉट्सॲपवर अवमानकारक स्टेट्स ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या अदिती गणेश बाबर यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Pune News

Pune News

मुंबई तक

20 Feb 2026 (अपडेटेड: 20 Feb 2026, 08:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत व्हॉट्सॲपवर अवमानकारक स्टेट्स

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime : आदित्य भावर -  महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत व्हॉट्सॲपवर अवमानकारक स्टेट्स ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या अदिती गणेश बाबर यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : '..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

आदिती बाबर यांनी व्हॉट्सअॅपवर पाहिला व्हिडिओ

तक्रारीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे नाका परिसरातील महात्मा फुले दांम्पत्यांच्या स्मारकाजवळ तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या व्हिडिओत महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. आदिती बाबर यांनी संबंधित व्हिडिओ व्हॅट्सअॅप स्टेट्सवर पाहिला. व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवलेल्या तरुणाचे नाव कृष्णा चौधरी असे आहे. 

महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप 

आदिती बाबर यांनी दि: 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता स्टेट्‍स पाहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणात महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

हे ही वाचा : चंद्रपूर : कारल्याची भाजी बनवल्याचा लेकाला राग, नंतर आईचीच केली निर्घृणपणे हत्या

दरम्यान, कोणत्याही महामानवाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशारा आदिती बाबर यांनी दिला. संबंधित प्रकरणात तक्रार नोंदवताना संध्या शिंदे व महेश पाटील हे घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत. 

    follow whatsapp