Pune Crime: पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पीडितेच्या आईच्या मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून दुधाने लॉन्स डीपी रोड परिसरात कारमध्ये मध्ये मुलीसोबत बळजबरीने शाररीक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती आहे. घटनेनंतर, आरोपीने अल्पवयीन मुलीला "कोणाला सांगितलं तर बघून घेईन" अशी धमकी सुद्धा दिल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
संबंधित घटना 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 ते 9:00 वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी, वारजे पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 32 वर्षीय आरोपीं नाव ज्ञानेश्वर रायरीकर असल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, पीडित मुलीची आई विधवा असून ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र असून त्या दोघांमध्ये चांगली ओळख होती.
हे ही वाचा: अहिल्यानगर: 15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार! 5 दिवस जंगलात ठेवलं.. 'लव्ह जिहाद'चा आरोप; तिन्ही आरोपी गजाआड!
रोडवर गाडी थांबवून लैंगिक अत्याचार
मुलीच्या आईचा आरोपी ज्ञानेश्वरवर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्यासोबत फिरण्यासाठी तिने परवानगी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वरला बोलवलं आणि त्याने देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला आपल्या कारमध्ये बसवलं. मात्र, शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आरोपी मुलीला डीपी रोडवर घेऊन गेला आणि शाळेत न सोडता गाडी डीपी रस्त्यावरच थांबवली. तिथे आरोपी ज्ञानेश्वरने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.
हे ही वाचा: बीड: दहावीचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थांना मंडपात बसावं लागणार... शिक्षण विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
आईने पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
दरम्यान पीडितेची आई आपली मुलगी शाळेत पोहोचली की नाही, याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती, माहिती समोर आली. त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने शाळेत जाण्यासाठी अर्धा तास का उशीर झाला? याबाबत तिची विचारपूस केली आणि त्यावर मुलीने घाबरत उत्तर दिली. यावरून आईने थेट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











