बीड: दहावीचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थांना मंडपात बसावं लागणार... शिक्षण विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. बीड तालुक्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी चक्क मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थांना मंडपात बसावं लागणार...

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थांना मंडपात बसावं लागणार...

मुंबई तक

• 11:53 AM • 20 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थांना मंडपात बसावं लागणार...

point

बीडमधील शिक्षण विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

बीड - योगेश काशिद: बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. बीड तालुक्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी चक्क मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या वाढल्याचे कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून येथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. 

हे वाचलं का?

मंडपात परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास 

बीड तालुक्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी नियमित वर्गखोल्यांऐवजी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे कारण देत ही तात्पुरती सोय करण्यात आली असून, येथेच सर्व परीक्षार्थींना बसून परीक्षा द्यावी लागणार आहे. मंडपात परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागणार आहेत. सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उकाडा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. मंडपात योग्य वेंटिलेशन, प्रकाश आणि बसण्याची सोयीस्कर व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता बिघडू शकते. शिवाय, परीक्षेच्या वेळी वादळी वारे आल्यास आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. ही व्यवस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अपुरी ठरत आहे. 

हे ही वाचा: अहिल्यानगर: 15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार! 5 दिवस जंगलात ठेवलं.. 'लव्ह जिहाद'चा आरोप; तिन्ही आरोपी गजाआड!

शिक्षण विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह 

बारावीच्या परीक्षेनंतर दहावीच्या परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना जाहीर केल्या होत्या. सीसीटीव्ही, ड्रोन सर्वेक्षण, कडक बंदोबस्त अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र, कुर्ला केंद्रावरील ही परिस्थिती शिक्षण विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने पालक आणि शिक्षण क्षेत्रातील घटकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. 

    follow whatsapp