Govt Job: इस्त्रो (ISRO) मध्ये काम करण्याची संधी! काय आहे पात्रता? अप्लाय करण्याची शेवटची तारीख...

तरुण उमेदवारांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पात्रता तसेच, अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

'इस्त्रो स्पेस सेंटर'मध्ये काम करण्याची संधी!

'इस्त्रो स्पेस सेंटर'मध्ये काम करण्याची संधी!

मुंबई तक

• 01:52 PM • 20 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

इस्त्रो (ISRO) मध्ये काम करण्याची संधी!

point

अप्लाय करण्याची शेवटची तारीख...

point

पात्रतेसह संपूर्ण माहिती जाणून घ्या

ISRO VSSC Internship 2026: कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) काम करण्याचा अनुभव मिळवण्याची उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इस्त्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) कडून इंटर्नशिपसाठी रसिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयातील शिक्षणासोबतच देशातील प्रतिष्ठित ऑर्गनाइजेशनमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार vsscinternship.vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकतात.

हे वाचलं का?

या इंटर्नशिप भरतीसाठी 16 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 16 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

काय आहे पात्रता? 

इस्त्रोच्या या इंटर्नशिप प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं बी.ई/ बीटेक/ बीएससी (फिजिक्स/केमिस्ट्री)/ इंटीग्रेटेड एमससी/ बीएस-एमएस (फिजिक्स/केमिस्ट्री)/ इंटीग्रेटेड एमटेक या क्षेत्रात किमान 4 सेमिस्टरपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. यामध्ये उमेदवारांचे किमान गुण 60 टक्के किंवा CGPA 6.32 असणं अनिवार्य आहे. 

हे ही वाचा: पुणे हादरलं! आईच्या मित्राचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत सोडतो सांगून असं कारमध्ये बसवलं अन्...

तसेच, एमई/ एमटेक/ एमएससीच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. तसेच, निवड प्रक्रियेत बी.ई/ बीटेक/ बीएससी विषयातील गुण देखील विचारात घेतले जातील. यासोबत, पीएचडीचे विद्यार्थी देखील इंटर्नशिपसाठी पात्र असून त्यांना त्यांच्या एमई/ एमटेक/ एमएससी/ बीई/ बीटेक किंवा समकक्ष विषयात किमान 60 टक्के गुण असणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा: '..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

कसा कराल अप्लाय? 

1. इस्त्रोच्या इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम vsscinternship.vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. आता, Internship सेक्शनमधील Current Internship Slot मध्ये इतर डिटेल्स दिसतील. 
3. त्यानंतर, Click Here to Login वर क्लिक करून ईमेल आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. 
4. आता, तुमच्या वैयक्तिक माहितीसह सर्व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा. 
5. सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर, आवश्यक डॉक्यूमेंट्स स्कॅन करून सबमिट करा. 

ही इंटर्नशिपची संधी तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरसाठी असून उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकतात. 

    follow whatsapp