पुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे.
ADVERTISEMENT
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.
हे ही वाचा>> काश्मीरमध्ये घुमणार गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, पुढील वर्षीपासून काश्मीरमधील 5 जिल्ह्यात गणेशोत्सव
या वर्षीही दि. 28 ऑगस्ट ते दि. 5 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळीत हे आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन अशा महत्वाच्या तपासण्या होणार आहेत.
करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन
या तपासण्याचे अहवालही मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरासाठी गणेशभक्त थेट आरोग्य शिबीरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात तसेच आधीदेखील ऑनलाईन पद्धतीने नाव रजिस्टर करून आपले नाव नोंदवू शकतात, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक - https://bit.ly/Aarogyashibir
हे ही वाचा>> जुनी वृक्ष कापू नका, त्याऐवजी... पुण्यातील धारीवाल फाऊंडेशनचं पुनर्रोपण अभियान
याबाबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन म्हणाले की, 'भक्तांना चांगलं आरोग्य लाभावं, हा आपल्या अध्यात्माचा पाया आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगलं आरोग्य लाभावं या हेतूने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अधिकाधिक गणेश भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, ही विनंती!'
ADVERTISEMENT
