जुनी वृक्ष कापू नका, त्याऐवजी... पुण्यातील धारीवाल फाऊंडेशनचं पुनर्रोपण अभियान
आर. एम. धारीवाल फाऊंडेशन हे परिपक्व वृक्ष पुनर्रोपण अभियान पुण्यात राबवत आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT

पुणे: आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे मुख्यालय पुणे येथे असून, गेली 40 वर्षे रसिकलाल एम. धारीवाल आणि शोभा आर. धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये 50 हून अधिक संस्थांद्वारे फाऊंडेशनने असंख्य नागरिकांच्या जीवनावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकला आहे.
आज फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन हा वारसा पुढे नेत आहेत. परिपक्व वृक्ष सरसकट कापण्याऐवजी, त्यांचे पुनर्रोपण करून त्यांना नवजीवन देणे हे त्यांचे नवीन ध्येय आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगर पालिका (PMC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या सहकार्याने राबविला जात आहे.
आपल्या देशात दररोज रस्ते, बांधकामे आणि इतर विकासकामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. विकास आवश्यक असला तरी प्रत्येक परिपक्व वृक्ष तोडणे म्हणजे आपल्या पर्यावरणाची मोठी हानी करणे. पण वृक्ष पुनर्रोपणामुळे या झाडांना दुसरे जीवन मिळू शकते अशी खात्री आहे.
- एक परिपक्व झाड दररोज 4 माणसांसाठी पुरेसा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू निर्माण करते.
- प्रत्येक झाड दरवर्षी 10-40 किलो कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेते.
- झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे 80% झाडे व्यवस्थितरीत्या जगतात.
आत्तापर्यंत RMD फाऊंडेशनने पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात 2100 हून अधिक परिपक्व झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे.