पुण्याची गोष्ट : पुण्यातील हवाई प्रवाशांसाठी मोठी अपडेट, 'या' शहरांना थेट कनेक्टिव्हीटी

मुंबई तक

• 07:40 PM • 31 Mar 2026

Pune news : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चार शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 15 नवीन स्लॉटची संधी दिलीये.

Pune news

Pune news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

1 मे पासून 15 नवीन स्लॉट कार्यन्वित

point

देशातील कनेक्टिव्हीटी मजबूत राहण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चार शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 15 नवीन स्लॉटची संधी दिलीये. ज्यात सोलापूर, बागडोगरा, तिरुपती आणि मंगळूर या चार शहरांसाठी फायदेशीर आहे. अशातच पुणे विमानतळाने 29 मार्च रोजी नवीन उन्हाळी वेळापत्रक लागू केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

1 मे पासून 15 नवीन स्लॉट कार्यन्वित

1 मे पासून 15 नवीन स्लॉट कार्यन्वित होतील, विमानतळाची एकूण स्लॉटची क्षमता 235 वर पोहोचली. 216 स्लॉटचा वापर करून एकूण उर्वरित असलेले स्लॉट विमानांच्या उपलब्धतेनुसार नवीन कंपन्यांना दिले जातील. याच विस्तारातून दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मेट्रोपोलिटन शहरांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिल्याचे सांगण्यात येते.

 देशातील कनेक्टिव्हीटी मजबूत राहण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय

देशातील कनेक्टिव्हीटी मजबूत राहावी यादृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.  15 इतर अतिरिक्त स्लॉटमुळे सोलापूर, तिरुपती आणि मंगळूरसारख्या नवीन शहरांच्या मार्गांवर सेवा सुरु होण्यास मदत निर्माण होईल अशी शक्यता आहे. यामुळे पुण्यातील अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळेल, अशी माहिती पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी माहिती दिली. 

हे ही वाचा : मुंबईसह ठाणे लोकसभेची श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची यादी समोर

नवे मार्ग कोणते? 

पुणे ते बागडोगरा : AIR India
सोलापूर आणि तिरुपती - Star Air
पुणे ते मंगळूर - FLY 19