Pune Crime : पुण्यातील बाजीराव रोडवर मंगळवारी दुपारी एका जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येमागेचं कारण आता समोर आलं आहे. आरोपीला मृत तरुणाने जुलै महिन्यात मारहाण केली होती आणि त्याचा अश्लील व्हिडिओ देखील बनवला होता. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपीने दोन साथीदारांना भेटून मिळून त्याची हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महिलेनं DNA चाचणी केली, धक्कादायक रिपोर्ट आला समोर, सूनेला सासऱ्यापासून झालं लेकरू
अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात आता खडक पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आणि बाल सुधारगृहात उभं केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख ही मयंक सोमदत्त खरारे (वय 17) असे त्यांचे नाव आहे. अशातच किशोर अभिजीत संतोष इंगळे (वय 16) या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला असता, त्याचा मित्र गंभीररित्या जखमी झाले आहेत.
जून्या वादातूनच हत्या
या प्रकरणात पोलिसांच्या एकूण तपासातून समोर आले की, जून्या वादातूनच ही हत्या करण्यात आली. मृत मयंक नावाच्या तरुणाने 25 जुलै रोजी नाबालिक आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
हे ही वाचा : सुरेश रैना आणि शिखर धवनला ईडीचा मोठा दणका, 11 कोटींची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी आरोपीने आपल्या दोन साथीदारांना बोलावले आणि मयंकला बाजीराव रोडवर बोलावून धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला होता. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. तीन अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. दरम्यान, सर्वांनाच बाल सुधारगृहात पाठवले आहे.
ADVERTISEMENT











