पुणे: पुण्यात एका 18 वर्षीय युवकाने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत असं या युवकाचे नाव असून, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक ऑडियो रेकॉर्ड केला होता. यात त्याने म्हटले आहे, "मम्मी, मी माझा मोबाइल तोडणार आहे. कोणताही पुरावा राहणार नाही. मी मरू इच्छितो. मी विष प्राशन केलंय. मी लोकेशन पाठवलं आहे. माझा मृतदेह घेऊन जा." देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने डिप्रेशनमुळे हे टोकाचं पाऊल उचलले.
ADVERTISEMENT
मृतदेहाजवळ सापडली विषारी ओषधाची बाटली
हे ही वाचा >> राजा रघुवंशी मर्डर : सोनमला फ्लॅट देणाऱ्या ब्रोकरच्या मुसक्या आवळल्या! पोलिसांना 'त्या' ब्लॅक बॅगमध्ये काय सापडलं?
17 जून रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात संजय बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटलीही सापडली. पोलीस तपासात संजयने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाले असून, पोस्टमॉर्टम अहवालानेही याची पुष्टी केली आहे.
तरूणानं व्हिडीओमध्ये काय म्हटलं?
"जसे सगळे मरतात, तसा मीही मरतोय. मला कुणाला काही म्हणायचं नाहीये. आई-वडिलांना एवढं म्हणणे की, माझ्या बहिणींना काही त्रास होऊ देऊ नका. मला फक्त माझ्या बहिणींची चिंता आहे. बाकी मला कुणाची चिंता नाही."
संजय हा पिंपरी-चिंचवड परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणींचा समावेश आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये त्यानं आपल्या बहिणींच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि आई-वडिलांना त्यांना उच्च शिक्षण देण्याची विनंती केली. एका व्हिडिओतही संजय डिप्रेशनमध्ये असल्याचं दिसून आलं आहे.
ऑनलाइन मागवलं विषारी औषध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने ऑनलाइन विषारी औषध मागवलं होतं आणि त्याच औषधाचं सेवन करून त्यानं आत्महत्या केली. सध्या देहूरोड पोलीस आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओची सखोल तपासणी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, डिप्रेशनमुळे तरुण पिढी टोकाची पावलं उचलत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
