राजा रघुवंशी मर्डर : सोनमला फ्लॅट देणाऱ्या ब्रोकरच्या मुसक्या आवळल्या! पोलिसांना 'त्या' ब्लॅक बॅगमध्ये काय सापडलं?

मुंबई तक

Raja Raghuwanshi Murder Case : राजा रघुवंशी हत्याप्रकरणात शिलाँग पोलिसांना खूप मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी याप्रकरणाशी संबंधीत एक महत्त्वाची ब्लॅक बॅग जप्त केली आहे.

ADVERTISEMENT

Raja Raghuwanshi Murder latest Update
Raja Raghuwanshi Murder latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

point

सोनमला मदत करणाऱ्या त्या व्यक्तीला अटक

point

ब्लॅक बॅगमध्ये पोलिसांना काय सापडलं?

Raja Raghuwanshi Murder Case : राजा रघुवंशी हत्याप्रकरणात शिलाँग पोलिसांना खूप मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी याप्रकरणाशी संबंधीत एक महत्त्वाची ब्लॅक बॅग जप्त केली आहे. राजाची हत्या केल्यानंतर सोनमने ही ब्लॅक बॅग शिलाँगहून इंदौरला आणली होती. ही बॅग शोधण्यासाठी पोलीस इंदौरहून शिलाँगपर्यंत सर्च ऑपरेशन करत होती. 

कुठे सापडली ब्लॅक बॅग?

धक्कादायक बाब म्हणजे ही ब्लॅक बॅग इंदौरमध्ये प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्सच्या घरात सापडली. हेच तेच ठिकाण आहे, जिथे राजाची हत्या केल्यानंतर सोनम रघुवंशी भाड्याने राहत होती. 

प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्स अटकेत

शिलाँग पोलिसांनी याप्रकरणी प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्सला अटक केली. आरोप केला जात आहे की, त्याने आरोपी विशाल चौहानला फ्लॅट भाड्याने दिला होता. जिथे सोनम लपली होती. अटक होण्यापूर्वी शिलोम पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच फोनही बंद होता.

हे ही वाचा >> सोबत फिरायला गेले आणि गाडीतच मित्राचा जीव घेतला... मुळशीतील हादरवून टाकणारी घटना काय?

तपासादरम्यान, ऑटो चालकानने पोलिसांना मोठी माहिती दिली. एक अॅपच्या माध्यमातून नंदबागहून एक बॅग बुक केली होती. ही बॅग हीराबागमध्ये एक तरुणाने रिसिव्ह केली. याच बॅगेत हत्येशी संबंधीत पुरावे होते.

बॅगमध्ये काय काय सापडलं?

पोलीस तपासात समोर आलं आहे की, या ब्लॅक बॅगमध्ये देशी पिस्तुल, 5 लाख रोख रक्कम, राजा रघुवंशीची चैन, मोबाईल, सोनमचे कपडे आणि दागिने सापडले. एसआयटी टीमने 3 ते 10 पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये एका संशयित व्यक्तीची बॅग नेताना दिसली. पोलिसांनी याच फुटेजच्या माध्यमातून कारवाई केली.

हे ही वाचा >> दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?

जेम्सला पोलिसांनी इंदौर आणि देवास दरम्यान अटक केली. त्याला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. जेम्सला पोलिसांनी रिमांडवर घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. शिलाँग पोलीस या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना सहकार्य करत आहे. ब्लॅक बॅग जप्त केल्यानंतर महत्त्वाचे पुरावे सापडू शकतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp