Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत भरती, महिन्याला दीड लाखांहून अधिक पगार

भारत सरकारच्या कंपनीत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2026 ही आहे.

ADVERTISEMENT

NLC Recruitment 2026
NLC Recruitment 2026
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

NLC Recruitment 2026 : एनएलसी इंडिया लिमिटेडने (NLC India Limited) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी शाखांच्या तब्बल 143 पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेद्वारे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मायनिंग या प्रमुख शाखांमधील पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, यामध्ये मेकॅनिकलसाठी 66, इलेक्ट्रिकलसाठी 44, सिव्हिलसाठी 23 आणि मायनिंगसाठी 10 पदे निश्चित करण्यात आली आहेत.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात किमान 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक असून, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 50 टक्के ठेवण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांनी 'गेट 2025' (GATE 2025) परीक्षा दिलेली असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादेचा विचार करता, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 नोव्हेंबर 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे, ज्यामध्ये नियमानुसार एससी/एसटी प्रवर्गाला 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर डीएनए चाचणीत भयंकर उलगडा

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, 13 नोव्हेंबर 2026 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि 14 डिसेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज शुल्क म्हणून जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 854 रुपये, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांना 354 रुपये शुल्क भरावे लागेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार असून, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट www.nlcindia.in वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकतात.

हे ही वाचा : चिमुकल्याची हत्या करुन किडनी अन् डोळे काढले, अवयव विकून व्हायचं होतं श्रीमंत, कोण आहे आरोपी?

पगार किती मिळणार?

या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ई-२ ग्रेडनुसार 50,000 ते 1,60,000 रुपयांपर्यंत आकर्षक वेतनमान मिळणार असून, प्रतिवर्षी अंदाजे 14.50 लाख रुपयांचे सीटीसी (CTC) पॅकेज दिले जाईल. अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची ही एक उत्तम संधी असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.