भीषण अपघातात जुन्नरच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू, हायवा आणि कारची समोरासमोर धडक

मुंबई तक

26 Apr 2026 (अपडेटेड: 26 Apr 2026, 10:12 AM)

Pune Accident News : जुन्नर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा मृत्यू झालाय. शिवाय आणखी दोघं यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News

Accident News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भीषण अपघातात जुन्नरच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू

point

हायवा आणि कारची समोरासमोर धडक

Pune Accident News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात नायब तहसीलदारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर हायवा आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर महसूल विभागातील कर्मचारी विजय खर्तोडे (वय 48) हे गंभीर जखमी झाले असून तुषार भीमराव कोरडे (वय 35) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : ब्युटी पार्लरचं ओपनिंग 6 दिवसांवर येऊन ठेपलं.., अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार असतानाच शिल्पाचा मृतदेह सापडला

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल अधिकाऱ्यांची Honda City (कार क्रमांक MH 12 FF 6423 ) बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात होती. त्याचवेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवाची(क्रमांक-MH 14 K00812) हा एस कॉर्नरवर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कार फिरून उलट दिशेला वळली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. येथून प्रवास करणारे पत्रकार अरुण मोरे यांनी या जखमींना आपल्या कार मध्ये हॉस्पिटमध्ये घेऊन गेले. दरम्यान, गंभीर जखमी अनंता गवारी यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जिममध्ये सुरु होतं बर्थडे सेलिब्रेशन, तोंडाला फक्त केक लावला अन् घडलं हत्याकांड; किती जणांनी गमावला जीव?