Pune Crime : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता गुन्हेगारीचं हॉट्स्पॉट बनल्याचं बोललं जातंय. याच पुण्यातील कोंढवा परिसरात एका शाळकरी 14 वर्षीय विद्यार्थ्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करत सपासप वार करण्यात आले होते. या घटनेनं कोंढवा परिसरात हादरून गेले आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी शाहरूख मोहम्मदीन फिरोज खान, मरियम शाहरूख खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कल्याण हादरलं! एकानं मैत्री करत ठेवले शरीरसंबंध, व्हिडिओ बनवून सात जणांनी आळीपाळीने केले लैंगिक अत्याचार, पीडिता राहिली गर्भवती..
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित लहान मुलाच्या वडिलांचे आरोपी शाहरुखसोबत पैशांवरून वाद झाले होते. 22 सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे पीडित मुलाच्या घरी गेले आणि त्यांना शिवीगाळ केली. यामुळे हे प्रकरण आणखीच तापलं गेलं. तेव्हा आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या आईला बेदम मारहाण देखील करण्यात आली होती, तेव्हा अल्पवयीन मुलाने या वादात मध्यस्थी केली असता, मोठा वाद उफळला गेला.
आरोपीने मुलाला शिवीगाळ करत छातीवर केले वार
संबंधित प्रकरणात आरोपीने मुलाला शिवीगाळ करत त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर या घटनेत पीडित मुलगा गंभीरररित्या जखमी झाल्याचं समजतं. या घटनेची एकूण माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपी शाहरूख आणि त्याची पत्नी मरियम यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : राज्याला पावसानं झोडपलं, कोकणासह मराठवाड्यात शेतकऱ्यांची उडाली दाणादाण, आजची हवामान परिस्थिती वाचा
दरम्यान, पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर असल्याचं आपण अनेकदा म्हणतो. मात्र, याच पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात पुण्यातील कोथरूड, कोंढवा या भागात मोठ्या परिसरात गुन्हेगारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात. पुण्यात दररोज किंवा दिवसाआढ गुन्ह्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
