भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला

pune crime : कौटुंबिक कलहातून मेहुण्याने दाजीचा खून केला आहे. या हत्येत मेहुण्याने आपल्या दाजीवर धारदार शस्त्राने उजव्या हातावर सपासप वार करत हातच कोपऱ्यापासून छाटला आहे. मेहुण्यानं असं कृत्य करण्यामागचं कारण समोर आलं आहे.

pune crime

pune crime

मुंबई तक

23 Sep 2025 (अपडेटेड: 23 Sep 2025, 06:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी चिंचवडमध्ये मेहुण्याकडून दाजीवर सपावर वार

point

भावाने बहिणीला 'त्या' कारणावरून केलं विधवा

Pune Crime : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण झाली आहे. याच पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कौटुंबिक कलहातून मेहुण्याने दाजीचा खून केला आहे. या हत्येत मेहुण्याने आपल्या दाजीवर धारदार शस्त्राने उजव्या हातावर सपासप वार करत हातच कोपऱ्यापासून छाटला आहे. मेहुण्यानं असं कृत्य करण्यामागचं कारण समोर आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : राज्यातील कोकण भागात पावसाचा जोर वाढणार, तर इतर भागात पावसाची स्थिती कशी राहणार?

दरम्यान, आरोपींमध्ये इतरही काही लोकांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. मृत झालेल्या दाजीचं नाव वैभव भागवत असे आहे. तर हल्ला करणाऱ्या मेहुण्याचं नाव योगेश गायकवाड असे आहे. अनिल बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. ही घटना 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 : 00 वाजता घडली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी संबंधित प्रकरणात सांगितलं की, आरोपीची बहीण ही दाजी वैभव भागवतची पत्नी असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी वैभवने आरोपी योगेश आणि इतर आरोपींशी अनेकदा वाद घातला होता. याच वादातून आरोपी रागावले होते, वैभव योगेशच्या बहिणीला तिच्या आईच्या घरी येऊ देत नव्हता. सतत त्रास द्यायचा आणि भांडण करायचा. याच वादातून ही हत्या करण्यात आल्याचं समजतंय.

दोन्ही हातांवर, नंतर छातीवर आणि डोक्यावर...

वैभव थोरात हा नागसेन बस्ती येथील पेपर शेडमध्ये इतर मित्रांसह बसला होता, तेव्हा आरोपीने अचानकपणे हल्ला केला होता. वैभवच्या दोन्ही हातांवर, नंतर छातीवर आणि डोक्यावर धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हल्ला करण्यात आला. गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : नवरात्रौत्सवात 25 सप्टेंबरपासून 'या' राशीतील काही लोकांच्या भाग्याचे दरवाडे उघडतील, काय सांगतं राशीभविष्य?

वैभव हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या हल्ल्यात त्याचा उजवा हात कोपरापासून छाटण्यात आला होता. त्याच्या डाव्या हातावरही अनेक जखमा होत्या. या एकूण घटनेनंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू करण्यात आल्यानंतर काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    follow whatsapp