हात बांधून, तोंडात बोळा कोंबून 11 वर्षाच्या मुलांवर अत्याचार, बालकाश्रमातला शिपाईच... पुणे हादरलं

मुंबई तक

19 Jun 2025 (अपडेटेड: 19 Jun 2025, 04:21 PM)

या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मुलांशी संवाद साधला असता, त्यांनी संपूर्ण हकिगत सांगितली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

10-11 वर्षांच्या दोन चिमुकल्यांचं लैंगिक शोषण

point

वाघोलीमध्ये बालकाश्रमात घडला चीड आणणारा प्रकार

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातील वाडेबोल्हाई येथील एका बालकाश्रमात एक चीड आणणारी घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. या प्रकरणी बालकाश्रमात शिपाई म्हणून काम करणाऱ्या रमेश दगडू साठे (वय 55, राहणार दत्तवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

तोंडात बोळा कोंबून करायचा भयंकर कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश साठे याने गेल्या काही महिन्यांपासून बालकाश्रमातील 10 आणि 11 वर्षीय दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केले. मुलांचे हातपाय बांधून, काही वेळा तोंडात बोळा कोंबून त्याने हे भयंकर कृत्य केलं. तसंच, मुलांनी कुणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही देत होता. या गंभीर प्रकाराची माहिती सहयाद्री आदिवासी ग्रामीण वकास प्रतिष्ठानच्या संचित व्यवस्थापकांना समजताच त्यांनी तात्काळ लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलांनी पोलिसांना सांगितली हकिगत

दरम्यान, या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता, पण आता या प्रकरणाचा तपास लोणीकंद पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मुलांशी संवाद साधला असता, त्यांनी संपूर्ण हकिगत सांगितली.

हे ही वाचा >> पुण्यातील महिलेने लिपस्टिकने लिहिली चिठ्ठी अन्... पुणेकरांना हादरवून टाकणारी घटना!

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश साठे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेनं बालकाश्रमातील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून, काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे.