पुण्यातील महिलेने लिपस्टिकने लिहिली चिठ्ठी अन्... पुणेकरांना हादरवून टाकणारी घटना!
पुण्यात विवाहितेनं आपल्या मुलाला घेऊन बिल्डिंगच्या टेरेसवरुन उडी मारली आणि त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी महिलेनं लिपस्टिकने चिठ्ठी लिहिल्याचं पोलिसांना आढळून आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील महिलेची पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

6 वर्षीय चिमुरड्यासोबत संपवलं आयुष्य

लिपस्टिकने चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं?
Pune News: बुधवारी (18 मे) पुण्यात विवाहितेनं स्वत:च्या मुलासोबत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या विवाहितेनं आपल्या मुलाला घेऊन बिल्डिंगच्या टेरेसवरुन उडी मारली आणि त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसंच्या माहितीनुसार, पीडित महिलेनं लिपस्टिकने एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्यात नंणदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं महिलेने लिहिलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव मयुरी देशमुख आणि तिच्या 6 वर्षीय मुलाचं नाव विष्णु शशिकांत देशमुख असं असून ते पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटीमध्ये राहत होते.
पाचव्या मजल्यावरुन उडी मारली अन्...
संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या 6 वर्षीय चिमुरड्याला घेऊन ती राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर म्हणजेच पाचव्या मजल्यावर गेली आणि तिथून तिने खाली उडी मारली. पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा: शेतातल्या घरावर दरोडा, वृद्ध महिलेचे कान तोडून दागिने चोरले; माझा मुलगा मिल्ट्रीत आहे, फोन लावते म्हणताच...
सासरच्या मंडळींसोबत भांडण
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मयुरी तिचे पती आणि 6 वर्षाच्या मुलासोबत कल्पकसृष्टी सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होती. ते मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहेत. दोन दिवसांपूर्वी खामगाव येथे गावी गेल्यानंतर मयुरी यांचं सासरच्या मंडळींसोबत मोठं भांडण झालं आणि त्यानंतर त्या एकट्याच आपल्या मुलासोबत पुण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी राहत असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवरुन आपल्या मुलासोबत त्यांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा: नागपूरमध्ये विवाहितेनं स्वत:ला संपवलं, अवघ्या 14 महिन्यांचा संसार...
लिपस्टिकने लिहिली चिठ्ठी
धक्कादायक बाब म्हणजे, मयुरीने असं करण्यापूर्वी लिपस्टिकने एक चिठ्ठी लिहिली आणि नणंदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने त्यात नमूद केलं. पोलीस तपासाकरता घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना ही चिठ्ठी मिळाली आणि ती त्यांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेसंबंधी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.