झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला, पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

17 May 2026 (अपडेटेड: 17 May 2026, 03:37 PM)

Pune Crime News : पुण्यात एका बापाने त्याच्याच मुलावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला केल्यानंतर तो फरार झालाय.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला

point

पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime News : पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून संतप्त झालेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलावर ॲसिड फेकल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरात घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तुषार कदम (वय 30) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर त्याचे वडील शाम कदम फरार झाले आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : आधी झाडाला बांधून मारले अन् नंतर प्रायव्हेट पार्ट्सचा घेतला चावा; 17 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी तुषार शाम कदम (वय 30) हे आपल्या घरात झोपलेले असताना पैशांच्या कारणावरून त्यांचा वडिलांसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात वडिलांनी घरातील स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲसिडची बाटली मुलाच्या चेहऱ्यावर फेकली.

हेही वाचा : नागपूर : फायनान्स एजंटला घरात घुसून संपवलं, 15 दिवसांपूर्वी आईचा मृत्यू अन्.. नेमकं कारण काय?

या हल्ल्यात तुषार कदम यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तुषार कदम यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच आरोपी वडील फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी कोथरूड पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमागे नेमका आर्थिक वाद काय होता, तसेच कुटुंबामध्ये यापूर्वीही वाद झाले होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. घरगुती वादातून थेट ॲसिड हल्ल्यासारखी गंभीर घटना घडल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू असून, कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आधी झाडाला बांधून मारले अन् नंतर प्रायव्हेट पार्ट्सचा घेतला चावा; 17 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?