Pune Crime News: पुणे: राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोठी खळबळजनक घटना घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबत हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका मोठ्या पिशवीत भरून दुचाकीवरून नेत असताना पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला. या संबंधित घटनेनं संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास 1.30 वाजता नांदेड सिटी पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणातील खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव हे बबिता राकेश निसार आहे. तर आरोपी पतीचं नाव हे राकेश रामनायक निसार आहे.
हेही वाचा : पुणे: मुळशीत शिवलिंगाची विटंबना करणारे बाप-लेक गजाआड, नेमके कोण आहेत आरोपी?
पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका दुचाकीवर ठेवला आणि भूमकर पुलानजीक दिशेने दुचाकी वाहन घातली. त्यानंतर आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकानं त्या दुचाकीची चौकशी केली असता, पती नेमका पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकलं असता हा प्रकार समोर आला.
यावेळी त्यानं आपल्या पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चाललो असल्याचं मान्य केलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी असलेला पती राकेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा : पतीचं लोकेशन मारेकऱ्यांना दिलं, त्याच ठिकाणी पतीला सपासप वार करुन संपवलं; जळगावचं प्रकरण काय?
या प्रकरणात नांदेड पोलीस अधिकारी एकूण तपासाची माहिती जाणून घेत आहेत. पोलीस आरोपीचा मोबाइल तपास करत आहेत. त्यातील कॉल रेकॉर्डची माहिती जाणून घेत आहेत. यामुळे घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
