पुणे : दारु पिऊन आलेल्या महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा VIDEO

Pune Crime News : पुणे शहरातील नऱ्हे पोलीस चौकीत आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याच्या कारणावरून एका 41 वर्षीय महिलेने दारूच्या नशेत गोंधळ घातला. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 11:06 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : दारु पिऊन आलेल्या महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा VIDEO

point

अपेक्षित तक्रार दाखल केली नसल्याने झाली आक्रमक

Pune Crime News : पुणे शहरातील नऱ्हे  पोलीस चौकीत आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी आलेल्या एका 41 वर्षीय महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांसमोर मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याच्या आणि आपल्याला सतत डावलले जात असल्याच्या संतापातून या महिलेने पोलीस चौकीतच आरडाओरडा करून अरेरावीला सुरुवात केली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याने तिने पोलीस कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करत पोलीस चौकीचे कामकाज विस्कळीत केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'माझा नवरा तृतीयपंथी..' नवविवाहितेच्या सुखी संसाराच्या स्वप्नाचा शेवट; नेमकं काय घडलं?

महिला आक्रमक कशामुळे झाली? 

 नऱ्हे पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून आता या महिलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आली होती, त्यावेळी पोलिसांनी तिच्या सांगण्यावरून समोरील व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र, आपल्याला अपेक्षित असलेला गुन्हा का? दाखल करण्यात आला नाही, या कारणावरून ती महिला आक्रमक झाली आणि तिने पोलीस चौकीत धिंगाणा घातला.

हेही वाचा : Maharashtra Weather : जून महिन्यात मान्सूनचं टेन्शन वाढलं, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट

वैद्यकीय तपासणीतून महिला नशेत असल्याचा खुलासा

पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला वारंवार शांत राहण्यास आणि पोलीस चौकीतून बाहेर जाण्यास सांगितले होते, परंतु तिने कोणाचेही ऐकले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणून तिने तिथे गोंधळ सुरूच ठेवला, ज्यामुळे चौकीतील दैनंदिन कामकाज काही काळ ठप्प झाले.  त्यानंतर परिस्थिती हाताळत पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत संबंधित महिला दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत तिच्यावर गुन्हा नोंदवला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात महिला पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे.

घटनेनंतर संबंधित महिलेने स्वतःचा व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यावर झालेला अन्याय आणि पोलिसांकडून होणारी उपेक्षा यामुळे आपण अस्वस्थ असल्याचे तिचे म्हणणे आहे. तसेच माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील, त्या मला मान्य आहेत, असेही तिने म्हटले आहे. कायद्याने कोणालाही पोलीस चौकीत येऊन गोंधळ घालण्याचा किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे पोलिसांनी या महिलेवर कडक कारवाई केली आहे. या घटनेची पुणे पोलीस दलात आणि नऱ्हे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, तऱ्हे पोलीस अधिक तपास करत आहेत.