Shirdi Accident : अहिल्यानगरातील शिर्डी- नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात काहीच तासांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 जण गंभीरपणे जखमी झालेत. या घटनेनं अहिल्यानगर शहर पूरतं हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालना जिल्ह्यात भीषण अपघात, कार जळून खाक; गाडीतच अडकला चालक अन्..
एस टी बसची एर्टींगा कारला भीषण धडक
घडलेल्या घटनेनुसार, पनवेलहून शिर्डीकडे नियमित वेळेप्रेमाणे एस टी बस येत होती. तेव्हा एर्टींगा कार नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. सावळीविहीर परिसरात दोन्ही वाहनांमध्ये अचानक भीषण धडक झाली. ती धडक इतकी तीव्र होती की, एर्टीगा कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दोघांवर काळाने घाला घातला आहे.
जखमींना साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल
घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत बचाव कार्य करण्यास सुरूवात केली. जखमींना तत्काळपणे साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळपणे घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा जागीच चक्काचूर झाला. दरम्यान जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 16 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण, चॉकलेट खाल्ल्यानंतर बेशुद्ध; 5 जणांनी मिळून...
संबंधित जखमींना शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून खोळंबलेली वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या अपघाताचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट उघडकीस आलेलं नाही.
ADVERTISEMENT












