पुणे : लग्नाच्या वाढदिवशी गावठी दारू प्यायले, दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

Pune crime : पुण्यातील दापोडी फुगेवाडीत विषारी दारूमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विषारी दारू प्राशन केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दोन सख्ख्या भावांनी लग्नाच्या वाढदिवशी विषारी दारू प्यायलाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune crime

Pune crime

मुंबई तक

• 02:53 PM • 30 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मृत्यूचे नेमकं कारण...

point

विजय राठोड यांच्या पत्नीची नोकरीची मागणी 

Pune Crime : पुण्यातील दापोडी फुगेवाडीत विषारी दारूमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विषारी दारू प्राशन केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याच प्रकरणात दोन सख्ख्या भावांनी लग्नाच्या वाढदिवशी विषारी दारू प्यायलाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढंच नाही,तर त्यांचे वडील देखील दारू प्यायले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : राहू गोचर 2026, 'या' राशीतील लोकांचा सुवर्णकाळ होणार सुरू, पैशांचा पडणार पाऊस

मृत्यूचे नेमकं कारण...

दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालेल्यांमध्ये राजेंद्र राठोड विजय (वय 34)  आणि विजय राठोड (वय 31) यांचा विषारी दारू पिऊन दुर्दैवी अंत झाला. दोन्ही मृतदेहांचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी त्यांचा व्हिसेरा रोखून ठेवला आहे. 

बुधवारी रात्री विजय राठोड यांना अचानकपणे त्यांना घाम येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने खडकी येथील कॅन्टोन्मेट जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. त्यांचा उच्च रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. 

हे ही वाचा : जळगाव : प्रेमी युगुल लॉजवर गेलं, अन् एकाची बॉडी सापडली; असं घडलं तरी काय?

विजय राठोड यांच्या पत्नीची नोकरीची मागणी 

दरम्यान दोघेही कुटुंबाचा आधार होते. सारिका विजय राठोड आणि संगीता राजू राठोड यांनी नोकरीची मागणी केली. अशातच महापालिकेनं केलेली एक लाखांची मदत ही अवघी तटपुंजी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.