पुढच्या चाकाखालून वाचली, पण मागच्या चाकाखाली आली महिला, अपघाताचं धडकी भरवणारं CCTV

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 11 Jun 2025, 03:10 PM)

मार्केटयार्ड ते आई माता चौकाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

point

अपघाताचं धडकी भरवणारं CCTV समोर

Pune Truck Accident : पुण्यात आज एक भीषण अपघात घडला. या अपघाताचं थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज सध्या सगलीकडे व्हायरल झालंय. बुधवारी सकाळी मार्केटयार्ड परिसरात झालेल्या या भीषण अपघातात एका महिला दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील गंगाधम चौकातील भीषण अपघाताचं सीसीव्ही सध्या व्हायरल होतंय.  

हे वाचलं का?

हे ही वाचा >>आधी मिठी मारतो नंतर Kiss करतो.. सीरियल किसरचा धुमाकूळ, महिलांमध्ये प्रचंड भीती!

मार्केटयार्ड ते आई माता चौकाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसतंय?

सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दृश्यानुसार सिग्नलवरुन सुटलेल्या स्कुटीला ट्रक मागून धडक देतोय. धडकेमुळे स्कुटीवरील दोघांचाही तोल जातो आणि खाली पडतात. तरीही ट्रक थांबत नाही. समोरच्या दोन्ही चाकांच्या मधून वाचलेले दोघांपैकी महिला मागच्या चाकाखाली येते. मागच्या चाकाखाली महिला चिरडली जाते. महिला या घटनेत जागीच ठार झाली.
 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, MH 14 AS 8852 हा ट्रक शौकत अली हा चालवत होता. तर जगदीश पन्नालाल सोनी (६१) आणि दिपाली सोनी हे दोघे दुचाकीवरुन जात होते. या अपघातात दिपाली सोनी या 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

अवजड वाहनांना बंदीची मागणी

या घटनेने पुन्हा एकदा अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असतानाही त्यांचा सुळसुळाट का? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. "नियमांचे पालन का होत नाही? एखादा जीव गमावल्यानंतरच कारवाई का केली जाते?" असे प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: 'ती' महिला कोण? म्हाडाची अधिकारी सांगून केला भलताच कांड!

स्थानिकांनी मागणी केली आहे की, अवजड वाहनांवर कडक निर्बंध लादले जावेत आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावं. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.