मुंबईची खबर: 'ती' महिला कोण? म्हाडाची अधिकारी सांगून केला भलताच कांड!

मुंबई तक

अधिकृत गृहनिर्माण योजनांच्या नावाखाली मुंबईतील प्रतिष्ठित म्हणजेच पॉश भागात कमी किमतीच्या फ्लॅट्सचे आमिष दाखवून कोटींची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

म्हाडाची अधिकारी सांगून कोटींची फसवणूक
म्हाडाची अधिकारी सांगून कोटींची फसवणूक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

म्हाडा अधिकारी अशी खोटी ओळख सांगून फसवणूक

point

स्वस्त फ्लॅट्स देण्याच्या नावाखाली कोटींची फसवणूक

point

कोटींची फसवणूक करणारी ही महिला नेमकी कोण?

Mumbai News: मुंबईसारख्या शहरात कमी किंमतीत फ्लॅट्स देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करुन बरेच गुन्हे घडत असल्याचं पाहायला मिळतं. अशीच एक बातमी समोर आली आहे. अधिकृत गृहनिर्माण योजनांच्या नावाखाली मुंबईतील प्रतिष्ठित म्हणजेच पॉश भागात कमी किमतीच्या फ्लॅट्सचे आमिष आरोपींकडून दाखवण्यात आलं. यासंदर्भात एका महिलेसोबत तीन व्यक्तींना 1.22 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दिंडोशी पोलिसांनी अटक केली. 

आरोपी महिलेचं नाव बेला डिसूझा असून तिने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे लोकांना भासवले. तसेच, जोगेश्वरी, गोरेगाव, माहीम आणि वांद्रे अशा प्रतिष्ठित शहरांमध्ये स्वस्त दरात फ्लॅट्स मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

पोलिसांनी या प्रकरणातील आणखी तीन आरोपींची ओळख पटवली आहे. केदार साटम, जितेंद्र राठोड आणि गिरीश राव अशी आरोपींची नावं असून ते सध्या फरार आहेत. या तिघांसोबत त्या महिलेवरही फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी केली कोटींची फसवणूक?

लोकमत टाईम्सच्या वृत्तानुसार, तक्रारदार रोहित चांदगोठिया हा मालाड येथील एक व्यापारी आहे. रॉकी अग्रवाल या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून रोहितची ओळख या स्वस्त दरात फ्लॅट्स मिळवून देणाऱ्या ग्रुपसोबत झाली. त्यावेळी पीडित व्यक्तीला केदार साटमने सुरुवातीला ओशिवरा येथे फ्लॅट मिळवून देणार असल्याचा दावा केला आणि नंतर त्याची ओळख बेला डिसूझाशी करून दिली, त्यावेळी बेलाची म्हाडाची वरिष्ठ अधिकारी अशी खोटी ओळख करुन देण्यात आली. चांदगोठिया यांना दादरमध्ये 80 लाख रुपयांना फ्लॅट देण्यात आला होता आणि तक्रारदाराने शेवटी 72 लाख रुपये रोख दिले. ही रक्कम जितेंद्र राठोड यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी त्यांना रक्कम दिल्याची पावती देण्यात आली मात्र फ्लॅट कधीच दाखवण्यात आला नसल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp