Pune News : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांच्या घटना सुरुच असल्याचं बघायला मिळत आहे. अशीच एका घटना पुण्यातील तळवडे-निगडी रोडवरील तळवडे चौकात घडली आहे. भरधाव पीएमपीएमएल ई-बसने एका गर्भवती महिलेला धडक दिली. या अपघातात एका नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली असून अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. देहूरोड पोलिसांनी बस चालक किरण भटू पाटील (वय 35) याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला पाठवले अश्लील फोटो, आरोपीवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
भीषण अपघातात 9 वर्षीय बहिणीचं निधन
संबंधित प्रकरणातील गर्भवती महिला ही प्रचंड गंभीर आहे, तसेच 9 वर्षीय मुलीचं अपघातात निधन झालं आहे. अपघातातील मृत मुलीचं नाव सुधा बिहारीलाल वर्मा असे आहे. तर गर्भवती महिलेचं नाव राममनोज वर्मा असे नाव आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने हा अपघात घडला आणि चालक किरण भटू पाटील यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राधा आणि तिचा पती तळवडे येथे एका खाजगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली.
घरी परतत असताना गर्भवती महिला जखमी
महिला ही गर्भवती असल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वी गावातील धाकट्या बहिणीला मदतीसाठी बोलावले होते. तसेच त्यांचा भाऊ देखील रोजगारासाठी एका खासगी कंपनीत काम करतो आणि त्यांच्याकडेच राहतो. 9 डिसेंबर रोजी नाईट शिफ्ट करून राधाचा पती घरी परतला आणि झोपला होता, तेव्हा राधा ही कामावर गेली होती. नंतर दुपारी 1 वाजता ती घरी परतत होती.
हे ही वाचा : एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कारमध्ये रोमान्स, मॅनेजरची नजर नको तिथेच... प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे
घरी परतत असताना रस्ता ओलांडताना त्यांना एका भरधाव बसने धडक दिली होती. या धडकेत सुधाचा मृत्यू झाला होता, तर राधा ही गंभीरपणे जखमी झाली होती. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ADVERTISEMENT











