पुणेकरांची प्रतिक्षा संपली, 33 वर्षांनंतर बाणेर-पाषाण लिंक रोड खुला होणार, वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार

Pune News : पुणे शहरातील बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या भागात गेली अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण व्हायचा, आता वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार असल्याची शक्यता आहे. बाणेर-पाषाण लिंक रोड वाहतुकीसाठी लवकर खुला केला जाईल अशी शक्यता आहे. 

Pune News

Pune News

मुंबई तक

• 06:47 PM • 06 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रस्त्याचा प्रस्ताव 1992 मध्ये जारी करण्यात आला होता

point

बाणेर-पाषणा लिंक रोड प्रकरणी वेल्फेअर ट्रस्टची न्यायालयात धाव

पुण्याची गोष्ट : पुणे शहरातील बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या भागात गेली अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण व्हायचा, आता वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार असल्याची शक्यता आहे. बाणेर-पाषाण लिंक रोड वाहतुकीसाठी लवकर खुला केला जाईल अशी शक्यता आहे. यासाठी 1.2 किमी लांब रस्त्यातील 200 मीटर अंतरापर्यंत भाग भूसंपादनाच्या अडचणीने तब्बल 33 वर्षांपासून प्रलंबित होता, मात्र महापालिकेनं उर्वरित कामासाठी कंत्राटदारांची नेमणूक केल्याने आता बाणेर-पाषाण लिंक रोडच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नी तरुणासोबतच्या शारीरिक संबंधांना चटावली, पतीचा प्रायव्हेट पार्ट अर्धवट कापला अन्...

रस्त्याचा प्रस्ताव 1992 मध्ये जारी करण्यात आला होता

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रस्त्याचा प्रस्ताव हा 1992 मध्ये जारी करण्यात आला होता, त्यानंतर थेट 2014 मध्येच कामाला सुरुवात झाली होती. मात्र, भूसंपादनाच्या अडथळ्यामुळे कामाचा वेग कमी झाला. यामुळे संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आणि ज्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली. 

बाणेर-पाषणा लिंक रोड प्रकरणी वेल्फेअर ट्रस्टची न्यायालयात धाव

संबंधित रस्त्याच्या प्रकल्पासाठी स्थानिकांनी देखील मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. 2021 मध्ये बाणेर-पाषणा लिंक रोड वेल्फेअर ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महापालिकेचे कम पूर्ण केले असता, ठराविक वेळापत्रकाचे आदेश देण्यात आले. याच कामाबाबत मोठा विलंब झाल्याने एप्रिल 2025 मध्ये अधिक कडक निर्देश देण्यात आले. 

हे ही वाचा : बीड: 17 वर्षीय विवाहित मुलगी बेपत्ता, वडिलांनी पोलीस ठाणे गाठत दिली माहिती, पोलीस तपासात मृतदेह विहिरीत आढळला

भूसंपादनासाठी 25 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा

संबंधित प्रकल्पासाठी पालिकेच्या प्रशानाने भूसंपादनासाठी 25 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले. हा रस्ता शहरातील मिसिंग लिंक पैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे येणाऱ्या काळात बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडीत अपेक्षा व्यक्त केली जातेय.