पुण्याची गोष्ट : राज्यात लवकरच पाऊस आपली उपस्थिती दर्शवेल असा अंदाज आहे. मात्र याबाबत ठोस सांगता येणार नाही. याचपार्श्वभूमीवर प्रत्येक महापालिका आपल्या शहराची साफसफाई करत आहेत. अशातच पुणे शहरात देखील पावसाच्या पार्श्वभूमीवर नाले तुंबू नये यासाठी नाल्याची साफसफाई करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख नाले, पर्जन्यजल वाहिन्या, चेंबर्स आणि मोऱ्यांची साफसफाई 31 मे रोजी पूर्ण केले जाणार असं बोललं जात होतं. तसेच 15 जूनपर्यंत सर्व काम 100 टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही! मंत्रिमंडळ बैठकीतील तीन धडाकेबाज निर्णय
प्लास्टिक, कचरा नाल्यात गाळ बनून आहे
पीएससी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रगती अहवालानुसार, स्वच्छता कामाची टक्केवारी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते, परंतु शहराच्या विविध भागांमधील वास्तविक परिस्थिती या दाव्यांशी जुळत नाही. अनेक भागांतील गटारे, अजूनही प्लास्टिक, कचरा आणि नाल्यात गाळ बनून आहेत, यामुळे नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मोऱ्यांची साफसफाई 74 टक्क्यांवरून 84 टक्क्यांपर्यंत
पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 28 मे पर्यंत गटार साफलफाईचे 75 टक्क्याने काम पूर्ण झाले होते. 31 मे रोजी हा आकडा 80 टक्क्यावर आणि 1 जून रोजी 82 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार, चेंबर दुरूस्तीचे काम 63.58 टक्क्यावरून 72.81 टक्क्यापर्यंत आणि मोऱ्यांची साफसफाई 74 टक्क्यांवरून 84 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
हे ही वाचा : Exclusive: 'निष्ठा पराभूत झालेली नाही, निष्ठेची चेष्टा झाली..', NCP चे माजी आमदार कोणावर संतापले?
गेल्या अनेक वर्षांपासून, पावसाळ्यात पुण्यात पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी या सामान्य समस्या बनल्या आहेत. अशावेळी प्रशासन मागील अनुभवांमधून धडा घेऊन वेळेवर तयारी करेल अशी आशा होती, परंतु सद्यस्थिती एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे. दरम्यान, पावसाळ्याला थोडा उशीर लागू शकतो, याचा स्थानिक प्रशानाला मोठा दिलासा मिळणार आहे. जेणेकरून पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता करण्यास मार्ग मोकळा राहू शकतो.
ADVERTISEMENT











