Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारला आग लागून व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना 31 मे 2026 रोजी घडली होती. सुरुवातीला हा प्रकार अपघाती वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, जालना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपासानंतर या घटनेमागील अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले असून, हा अपघात नसून एक नियोजनबद्ध खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?
स्वतःच्या मृत्यूचा रचला होता बनाव
तपासात समोर आलेली माहिती अशी की, नितीन प्रभाकर गवळी याने विम्याची मोठी रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. या कटासाठी त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश गवळी यांना सोबत घेऊन नाशिक येथील संदीप चौहाण या तरुणाचा गळा दाबून निर्घृण खून केला. त्यानंतर संदीपचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती वाहनासह जाळून टाकण्यात आली, जेणेकरून मृतदेह नितीनचाच आहे असा सर्वांचा समज व्हावा.
हेही वाचा : नवऱ्याने बायकोला कोंबडा बनवलं, अन् शेवटी नको ते केलं... मुंबईत 'ही' भलतीच घटना
विम्याची रक्कम मिळवणे, कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळवणे आणि वैयक्तिक अडचणींपासून सुटका करून घेण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासादरम्यान नितीन गवळी याने अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्या मदतीने नाशिक येथील संदीप चौहाण या तरुणाचा गळा दाबून खून केल्याचं उघड झालं.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी
या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावताना जाफराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1), 62 (2) (अ), 238 (अ) (ब) व 3 (5) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक काम करत आहे. सदर गुन्ह्यातील जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सध्या डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू आहे.
ADVERTISEMENT











