पुणेकरांसाठी मोठी बातमी, एप्रिलपासून वीज बिलात कपात होणार, महावितरणचा मोठा निर्णय

पुण्याची गोष्ट : कडाक्याच्या उन्हाळ्यात पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वीज बिलात काहीअंशी प्रमाणात चिंता मिटणार असल्याचं बोललं जातंय. महावितरणाच्या वीजदराच्या कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 

Pune News Electricity Bill

Pune News Electricity Bill

मुंबई तक

• 02:40 PM • 28 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा

point

2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात कमी करण्याचे नियोजन

पुण्याची गोष्ट : कडाक्याच्या उन्हाळ्यात पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उन्हाळ्यात अधिक एसी, कुलर तसेच फॅनसाठी विजेचा वापर होतो, यामुळे वीज बिलात अधिक वाढ होण्याची शक्यता असते. पण, आता याच वीज बिलात काहीअंशी प्रमाणात चिंता मिटणार असल्याचं बोललं जातंय. महावितरणाच्या वीजदराच्या कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 

हे वाचलं का?

38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा

1 एप्रिलपासून घरगुती वीज दरांत 30 पैसे प्रतियुनिट कपात केल्याची माहिती आहे. या निर्णयाने पुणे परिमंडळात 38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती आहे. महिनाअखेरीस तब्बल 10 कोटी रुपयांची बचत देखील होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणात राज्य सरकारने गुरुवारी हा निर्णय जारी केल्याची माहिती आहे.  

2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात कमी करण्याचे नियोजन

वीज निर्मितीसाठी लागणारं इंधन, कोळसा आणि इतर उत्पादनाचा खर्च कमी झाल्याने महावितरण, टाटा पॉवर आणि अदानीसारख्या वीज कंपन्यांच्या कपातीबाबत प्रस्ताव जारी करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात कमी करण्याचे नियोजन करण्यात आले. 

एकीकडे वीजदरात कपात झाली असली तरीही, (Wheeling Charges)  13 पैशांत वाढ करण्यात आली. सध्याचा वहन कर हा 1 रुपया 47 पैसे असून 1 रुपया 60 पैसे इतका होण्याची शक्यता आहे. मूळ स्वरुपात झालेली कपात अधिक असल्याने ग्राहकांच्या बिलामध्ये बचत होण्याची शक्यता आहे. 

किती वीजधारकांना होणार फायदा 

यासाठी पुणे शहर, राजगुरुनगर, हवेली आणि आंबेगाव या भागातील 38 लाख 71 हजार ग्राहकांना याचा थेट फायदा होईल, ज्यात घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक, वाणिज्यिक ग्राहक आणि कृषिपंप धारकांची आकडेवारी सांगितली आहे. 

33 लाख 87 हजार घरगुती ग्राहक

57 हजार 560 औद्योगिक ग्राहक

3 लाख 95 हजार वाणिज्यिक ग्राहक 

आणि 1 लाख 1 हजार कृषिपंप धारकांचा देखील यात समावेश आहे. 

याचा नागरिकांना फायदा होणार असून पुणेकरांनी या निर्णयाचे स्वागत केलं. यामुळे आता पुणेकरांना वीज बिलाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.