नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

योगेश पांडे

• 10:27 AM • 28 Mar 2026

Nagpur news : नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयाच्या आवारातील रेल्वे रुग्णालयात एका लोको पायलटने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या या लोको पायलटचे नाव सुधाकर चुनारकर (वय 50) असे होते.

Nagpur news

Nagpur news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

20 मार्च रोजी सुधाकर आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळले

point

शुक्रवारी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये आढळला मृतदेह 

Nagpur Suicide : नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयाच्या आवारातील रेल्वे रुग्णालयात एका लोको पायलटने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या या लोको पायलटचे नाव सुधाकर चुनारकर (वय 50) असे होते. संबंधित प्रकरणात निष्पन्न झालं की, ते चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी रहिवासी होते. संबंधित घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजता घडल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी.. चाकणकरांना खरात प्रकरण प्रचंड भोवलं, दिला सलग दुसरा राजीनामा! म्हणाल्या, ‘मी सकाळी सुनेत्रा वहिनींसोबत…’

सुधाकर यांनी वैद्यकीय उपचारांसाठी नागपूरातील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेचं गांभीर्य ओळखून विभागीय प्रशासन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

20 मार्च रोजी सुधाकर आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळले

घडलेल्या घटनेनुसार, 20 मार्च रोजी सुधाकर आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळले, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात भरती करण्यात आले होते, शुक्रवारी दुपारी सुधाकर यांनी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. संबंधित घटनेची माहिती समोर येताच, एकच खळबळ माजली. पोलिसांना सूचित करण्यात आले असता, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

हे ही वाचा : झिरवाळांच्या Video प्रकरणावर CM फडणवीसांचं मोठं विधान.. म्हणाले, 'तर कारवाई होईलच!'

शुक्रवारी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये आढळला मृतदेह 

सांगितलं जातंय की, शुक्रवारी दुपारी 2 वाजता सुधाकर हे रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात गेले पु्न्हा परतलेच नाही. ते बाहेर का येत नाही याचा सुधाकरच्या पुतण्याला संशय आला होता. जेव्हा त्यांनी आत जाऊन पाहिले असता, सुधाकर बाथरूममध्ये गळफासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेनंतर, शहरातील सदर पोलीस ठाण्यात 'अपघाती मृत्यू' (Accidental Death) म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.