Maharashtra Weather : राज्यात सध्या काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती, तसेच येत्या काही दिवसांत राज्यात अशाच पद्धतीच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोकणात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डोंबिवली: मित्र-मेत्रिणींसोबत गणपतीच्या दर्शनाला गेली पत्नी, नवऱ्याने केला चाकूने हल्ला
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई येथे विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला असून यलो अलर्टची शक्यता वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. धुळे येथे विजासंह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर येथे पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
हे ही वाचा : वाशिम: ‘...भाजी बनवता येत नाही', मद्यधुंद अवस्थेत भावावर लोखंडी रॉडने प्रहार
विदर्भ
विदर्भ विभागात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT












