मुंबईची खबर : उन्हाचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, लवकरच वीजेचे दर कमी होणार

घामाच्या धारांनी भिजून निघालेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबईकरांना मिळणाऱ्या विजेच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

Mumbai Electricity News

Mumbai Electricity News

मुंबई तक

• 01:00 PM • 28 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उन्हाचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना दिलासा

point

लवकरच वीजेचे दर कमी होणार

Mumbai Electricity News : मुंबईकर सध्या घामाच्या धारांनी भिजून निघत आहेत. अशा परिस्थितीत आधार वाटतो तो फॅन आणि एसीचा. मात्र वीजेचा वापर वाढल्याने खिशालादेखील कात्री लागते. अशा परिस्थितीत मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मुंबईला वीजपुरवठा करणारी कुडूस वाडा ते बोरीवली ही 1 हजार मेगावॅटची पारेषण वाहिनी एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे. ही वाहिनी सुरु झाल्यानंतर वीज प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त होणार असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

राज्यात तयार होणारी वीज मुंबईपर्यंत पोहोचवणे शक्य

राज्यात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी सौर ऊर्जा आणि इतर हरित ऊर्जा आता थेट मुंबईपर्यंत पोहोचवणे या वाहिनीमुळे सहज शक्य होईल. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात जेव्हा विजेची मोठी मागणी असते, तेव्हा राज्याच्या इतर भागांतील स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीज मुंबईकरांना उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे विजेचा तुटवडा भासणार नाही आणि नैसर्गिक स्रोतांचा वापर वाढल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल.

हे ही वाचा : नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

1 हजार मेगावॅटची भर पडणार

मुंबईची विजेची गरज साधारणपणे 4000 ते 4,500 मेगावॅटच्या दरम्यान असते. मात्र, या नव्या 'एचव्हीडीसी' लिंकमुळे मुंबईच्या वीज वाहून नेण्याच्या क्षमतेत आणखी १,००० मेगावॅटची भर पडणार आहे. विशेष म्हणजे, ही यंत्रणा आधुनिक असल्याने वीज गळतीचे प्रमाण अत्यंत कमी असेल, ज्यामुळे उपलब्ध ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य होईल. सध्या खारघर-विक्रोळी दरम्यान असलेल्या वाहिनीद्वारे शहराला वीजपुरवठा केला जातो.

हे ही वाचा : पुणे : राम जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने महिलेचा मृत्यू

40 ते 50 पैशांचा लाभ

या नवीन पारेषण वाहिनीतून मिळणाऱ्या विजेचा लाभ केवळ एका कंपनीला नसून सर्व मुंबईकरांना मिळणार आहे. यातील सुमारे २० टक्के वीज महावितरणला मिळेल, तर उर्वरित वीज बेस्ट (BEST), टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांना पुरवली जाईल. संबंधित कंपन्या जेव्हा त्यांचे वीजदर आणि इंधन अधिभार निश्चित करतील, तेव्हा ग्राहकांना प्रति युनिट ४० ते ५० पैशांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे अपेक्षित आहे.