कुंडमळ्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला..6 जणांचा मृत्यू, तर अनेक पर्यटक...

मुंबई तक

15 Jun 2025 (अपडेटेड: 15 Jun 2025, 06:28 PM)

indrayani river bridg collapse : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत 20 ते 25 लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या दुर्घटनेत 5 - 6 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.

मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

pune news Indrayani river pool collapsed

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

point

20 ते 25 लोक वाहून गेल्याची भीती

Indrayani River bridg collapsed : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळातील इंद्रायणी नदीचा पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 20 ते 25 लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या दुर्घटनेत 5 - 6 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज रविवारी (15 जून) रोजी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : कायदा अन् सुव्यवस्थेचा धाक उरला नाही, महिला पोलीस अधिकाऱ्यावर गुंडांकडून गोळीबार

गंभीर परिस्थिती पाहता घटनास्थळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी तैनात झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. कुंडमळा ओलांडण्यासाठी एक छोटा पूल आहे. तोच पूल कोसळल्याने मोठी जिवीत हानी निर्माण होऊन काही मोटारसायकल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा : मूक-बधिर तरुण कामगाराची गोळ्या घालून हत्या, गुन्हेगार मोकाट

या घटनेनं ग्रामीण पुणे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, सुट्टीच्या दिवशी हा अनर्थ घडला आहे. दरम्यान, काही जण हे पूलावर उभे होते, अशावेळी तो पूल कोसळला आहे. पावसाळा सुरु होण्याआधीच हे चित्र पाहायला मिळालं आहे. य घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे.