Pune News : पुणे जिल्ह्यातील बारामतीत एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. बारामतीतील बँक ऑफ बडोदाच्या ब्रँच मॅनेजरने बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली आहे. बँक मॅनेजरच्या मृतदेहासोबत एक सुसाईड नोटही सापडली. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बँक मॅनेजरने ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने कामाचा दबाव दिल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?
बँकेचे मॅनेजर शिवशंकर मित्रा (वय 52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील होते. त्यांनी रात्रीच बारामती स्थिती बँक ऑफ बडोदाच्या शाखेत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं आता बारामती हादरून गेली आहे. बारामतीतील ही पहिलीच घटना असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं बारामतीत एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचं कारण आलं समोर
पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास केल्यानंतर एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिलं. त्यात लिहिलं होतं की, मी शिवशंकर मित्रा, मी बँक ऑफ बडोदाचा मॅनेजर आहे. बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे मी आत्महत्येचं पाऊस उचलत आहे. मी विनंती करतो की कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव आणला जाऊ नये. प्रत्येकाला जबाबदारीचं भान आहे.
हेही वाचा : पुण्यातून वंदे भारत धावणार, गुजरातसह 'या' राज्यांना महाराष्ट्र जोडला जाणार
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
मी अगदी शुद्धीत असून मी माझ्या मर्जीनेच आत्महत्या करत आहे. यामध्ये माझ्या कुटुंबाचा काहीही एक दोष नाही. मी बँकेतील कामाच्या तणावामुळे आत्महत्या करत आहे. "प्रिया मला माफ करा", हे पत्र त्यांनी आपल्या कुटुंबियांना लिहिलं होतं. जर शक्य झालं तर माझे डोळे दान करावे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बारामती शहर पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी नेला. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT
