पुणे: अरे बापरे... अवघ्या 3 तासात एकाच जागी 10 अपघात, CCTV मध्ये भयानक दृश्य कैद

Pune News : वाढत्या गुन्हेगारीप्रमाणे पुण्यात वाहन अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. पुण्यातील एकाच रस्त्यावर तीन तासांत दहा वेळा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News

Pune News

मुंबई तक

17 Jul 2025 (अपडेटेड: 17 Jul 2025, 08:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात वाहन अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ

point

एकाच ठिकाणी दहा अपघात

Pune News : पुण्यात मागील काही वर्षात हिट अँड रनसारख्या अनेक घटना उघडकीस आल्या. वाढत्या गुन्हेगारीप्रमाणे पुण्यात वाहन अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. पुण्यात एका रस्त्यावर एकाच ठिकाणी मागील तीन तासांमध्ये एक दोन नाही,तर तब्बल दहा अपघात झाल्याची गटना उघडकीस आली. सुदैवाने या झालेल्या एकूण अपघातात एकही जीवित हानी झाली नाही. या अपघाताचे व्हिडिओ आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. या अपघाताला दुसरं तिसरं कोणीही नसून प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : VIDEO: विधानसभेच्या परिसरात तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!

नेमकं काय घडलं? 

मावळ तालुक्यातील देहू येथील येलवाडी मार्गावरील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रकरणात या मार्गवर प्रचंड खड्डे पडलेले दिसत आहेत. त्या खड्ड्यांमुळे एखादाचा नाहक बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे. यावर प्रशासनाने मुरूम आणून या खड्ड्यांमध्ये भरला. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती दिसून आली.

यामुळेच की काय अवघ्या तीन तासांच एक दोन नाही, तर तीन अपघात झाल्याचं चित्र दिसून आलं. पावसामुळे खड्डयात टाकण्यात आलेल्या मुरुमाचा चिखल झाला. याच ठिकाणाहून काही लोक प्रवास करताना दिसत आहेत. यामुळे छोटे मोठे अपघात होतात आणि या अपघातात ते घसरून पडले आहेत. यामुळे त्यांना छोट्या मोठ्या जखमाही झाल्या आहेत. 

हेही वाचा : नवरा बायकोच्या नात्याला काळीमा! पतीसमोरच पत्नी ठेवायची बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध, पतीनं उचललं टोकाचं पाऊल

व्हिडिओ व्हायरल 

याच प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीत या अपघाताचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. यामुळे पुणे प्रशासनाच्या नावाने पुणेकर बोंबा मारताना दिसत आहेत. दरम्यान, पुण्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडी होते असे स्थानिक म्हणतात. 

    follow whatsapp