नवरा बायकोच्या नात्याला काळीमा! पतीसमोरच पत्नी ठेवायची बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध, पतीनं उचललं टोकाचं पाऊल
Crime News : पत्नीने आपल्या पतीचे हातपाय बांधले आणि ती आपल्या प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवले. पीडित पतीने हे सर्व पाहून 11 जुलै रोजी रात्री 11 वाजता आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पती आणि पत्नी नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना

पतीसमोर प्रियकरासोबत ठेवायची शरीरसंंबंध
Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना आता उघडकीस आली आहे. या प्रकरणात पत्नीने आपल्या पतीचे हातपाय बांधले आणि ती आपल्या प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवले. पीडित पतीने हे सर्व पाहून 11 जुलै रोजी रात्री 11 वाजता आत्महत्या केली आहे. या घडलेल्या घटनेनंतर आरोपी पीडिताची पत्नी रुबीना, मेहुणा शाहरूख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रुबीनाचा कथित प्रियकर सलीमविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आसिफ असल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा : अनैतिक संबंधांसाठी आईने घेतला चिमुकलीचा जीव, मुलीच्या मृतदेहासमोरच महिलेने पार्टनरसोबत केलं एन्जॉय!
नेमकं काय घडलं?
आसिफच्या भावाने एफआयआरमध्ये सांगितलं की, 9 जुलै रोजी आसिफने त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सलीम यांच्याकडून होणाऱ्या छळाबाबत सांगितलं. त्याने सांगितलं की. त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
रुबीना पतीला गुंगूच्या गोळ्या द्यायची अन्...
आसिफने दिलेल्या माहितीनुसार, असिफने सांगितलं होतं की सलीम नशेच्या गोळ्या आणायचा आणि रुबीनाला द्यायचा आणि ती पती आसिफला त्या गोळ्या खायला द्यायची. जेव्हा तो नशेत असायचा तेव्हा त्याचे हातपाय बांधायची आणि त्यानंतर रुबीना आणि तिचा प्रियकर दोघेही आसिफच्या समोर शरीरसंबंध ठेवायचे.
आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर म्हणायचे की, तू असा मरणारातल्या नाहीस. तुला असं काही दाखवावं लागेल तेव्हाच तू मरशील, त्यानंतरच आमचा मार्ग मोकळा होईल. जेव्हा आसिफने त्याचा मेहुणा शाहरूखला पत्नीच्या कृत्याबाबत सांगितलं तेव्हा तो म्हणाला की आता तू विष प्राशन करून मरावं. तू स्वत: फाशी घे, तुझ्या जाण्याने माझी बहीण मुक्त होईल.
हेही वाचा : मुंबई: पाळणाघरातील चिमुकलीला मोबाइल दिला अन् बेडरूममध्ये नेऊन... 44 वर्षीय नराधमाचं गलिच्छ कृत्य
या प्रकरणात आसिफच्या आत्महत्येची आणि त्याच्या पत्नीच्या अशा कृत्याची जिल्ह्यात चर्चा झाली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.