तब्बल 7 जणांनी महिलेवर केला गँगरेप! 11 दिवस बांधून ठेवलं अन् सुरू होता नराधमाचा अत्याचार
Gangrape Crime News : राजस्थानच्या अलवर येथे विवाहित महिलेसोबत संतापजनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बगड तिराया पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातील विवाहित महिलेसोबत धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नराधमांनी विवाहित महिलेवर केला गँगरेप..

पीडितेला 11 दिवस बांधून ठेवलं अन् नंतर आळीपाळीने...

पीडितेसह कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली अन्..
Gangrape Crime News : राजस्थानच्या अलवर येथे विवाहित महिलेसोबत संतापजनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बगड तिराया पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातील विवाहित महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. सात नराधमांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी पीडित महिलेला 11 दिवस बांधून ठेऊन तिच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार केला. पीडिता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेली होती, परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
त्यानंतर पीडित महिला आणि तिचं कुटुंबीय कोर्टात पोहोचले, त्यानंतर कोर्टाने आदेश दिल्यावर एफआयआर नोंदवण्यात आलं. पीडित महिलेनं सांगितलं की, ती 25 एप्रिल 2025 च्या रात्री जवळपास 9 वाजता टॉयलेटसाठी बाहेर गेली. याचदरम्यान कारमधून प्रवास करणाऱ्या सात लोकांनी तिला बांधून ठेवलं. आरोपींनी तिला पनियाला रोडजवळ नेलं. तिथे आरोपींनी महिलेसोबत आळीपाळीने बलात्कार केला.
हे ही वाचा >> Mumbai Tak Baithak 2025: 'त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करूच..' CM फडणवीसांची माघार नाहीच, ठणकावून सांगितलं! ठाकरे बंधूंना थेट आव्हान?
महिलेनं विरोध केला, पण नराधमांनी तिचं तोंड बांधलं आणि..
पीडित महिलेनं विरोध केला, तेव्हा आरोपींनी त्या महिलेच्या तोंडात कापड टाकलं. पीडितेनं सांगितलं की, आरोपींनी तिला 11 दिवसापर्यंत बांधून ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्याचदरम्यान, आरोपींनी तिचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 11 दिवसानंतर आरोपींनी तिला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या बाजूला फेकलं आणि तिथून नराधम फरार झाले.
हे ही वाचा >> 20 वर्ष लहान तरुणाला पाहून 2 मुलांच्या आईची नियत फिरली, अनैतिक संबंधानंतर थेट...
त्यानंतर पीडित महिला कशीबशी तिच्या घरी पोहोचली आणि कुटुंबियांना घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत सांगितलं. या घटनेबाबत ऐकून कुटुंबातील लोकांना खूप भीती वाटली. त्यानंतर काही वेळानंतर कुटुंबातील लोक आणि पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोर्टाची पायरी चढली. कोर्टाच्या आदेशानंतर 2 जून 2025 रोजी पोलिसांनी तक्रार दाखल केली. परंतु, आरोपी फरार असून पीडिता न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारत आहे.