अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडला भेटायला गेली, मित्रांनी मिळून तिला... मोठं कांड आलं समोर
crime news : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्याच प्रेयसीचा खून करत तिची हत्या करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुशीनगरमध्ये एक धक्कादायक घटना

दोन तरुणांनी अल्पवयीन तरुणीचा केला खून
Crime news : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्याच प्रेयसीचा खून करत तिची हत्या केली आहे. खून करण्यात आलेल्या मुलीचे नाव किशोरी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. किशोरी आपल्या प्रियकराला भेटायला गेली होती, तेव्हाच प्रियकारने आपल्या मित्राच्या मदतीने निष्पाप प्रेयसीचा खून केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. एकाचं नाव सैफ अली असे आहे. तर दुसऱ्याचं नाव हे इम्तियाज उर्फ टिंकू असे आहे.
हेही वाचा : पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन्...
तरुणाने संबंधित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तरुणाचा एक मित्र अल्पवयीन मुलीच्या प्रेमात बुडाला होता. मुलीच्याच मित्राने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला माझं तुमच्या मुलीवर प्रेम असल्याचं सांगितलं. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. यानंतर संबंधित तरुणी ही रागाने लालबुंद झाली. त्यानंतर मुलगी आपला मित्र सैफ अलीला भेटण्यास गेली. तेव्हा सैफने इम्तियाजच्या सहाय्याने मुलीची हत्या केली.
हत्येनंतर सैफनं तिचा मृतदेह एका तलाव्यात फेकून दिला. सोमवारी पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा खुलासा केला. आरोपी सैफ आणि इम्तियाज दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : तुझ्या कामाच्या शिफ्टमुळे मी एकटा पडलो...प्रियकराने तरुणीवर 3 चाकूंनी 22 वेळा केले सापसप वार
पोलिसांनी लावला घटनेचा छडा
तरुणी जेव्हा घरातून बाहेर पडली होती, तेव्हा पिप्रा कपूर गावातील रहिवाशांनी 11 जुलै रोजी तरुणी बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 12 जुलै रोजी एका तलावात मृतदेह वरती आला होता. 13 जुलै रोजी देवरियामध्ये पंचनामा करण्यात आला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर कुशीनगरचे पोलीस अधीक्षक संतोष मिश्रा यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकही तयार केलं. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.