पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर

मुंबई तक

Crime News : आसामच्या गुवाहाटीमध्ये नवरा आणि बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्याच पतीचा खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा आणि बायकोच्या नात्याला काळीमा

point

पत्नीनेच नवऱ्याला जमिनीत पुरलं

crime news : आसामच्या गुवाहाटीमध्ये नवरा आणि बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्याच पतीचा खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. त्यानंतर संबंधित महिलेनं पोलीस ठाणे गाठलं आणि स्वत: सरेंडर होत खूनाचा कबुलीनामा दिला. खून केलेली पत्नी रहिमा खातून (वय 38) आणि तिचा मृत पती सियाल रहमान हे त्यांच्या दोन मुलांसोबत राहायचे. 

हेही वाचा : दारू पितो म्हणून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी सांगितलं की, रहिमाने सांगितलं की, 26 जून रोजी तिचा पती सियाल रहमान हा नशेत असताना तो आपल्या पत्नीसोबत भांडत होता. दोघांमधील वाद वाढू लागला याच वादात महिलेनं आपल्या नवऱ्याला धक्का दिला. त्यावेळी पती सियाल हा नशेत असल्यामुळे त्याचं संतुलन बिघडलं आणि तो खाली पडला असता, त्याला गंभीर दुखापत झाली. रहिमा सियालला उठवायला गेली असता, पतीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर रहिमाने पतीचा मृतदेह जमिनीत पुरला. 

या घटनेनंतर, रहिवाशांना रहिमाला पतीबाबत विचारले असता, ती नेहमी खोटं सांगायची. आपला पती हे केरळात गेल्याची खोटी माहिती तिनं सांगितली. एवढंच नाही,तर तिनं आपला पती हा रुग्णालयात आजारी असल्याचं खोटं सांगितलं. रहिवाशांना अशी चुकीची माहिती सांगितल्याने रहिवाशांना भलताच संशय आला. रहिमा काही तरी लपवत असल्याचा संशय स्थानिकांच्या लक्षात आला.  

तर दुसरीकडे सियालचा भाऊ आणि त्याचे कुटुंब सियालच्या संपर्कात होते. मात्र, सियालला फोनद्वारे संपर्क केला असता, सियालचा फोन बंद लागत होता. सियाल फोन का उचलत नाही? असा सियालच्या भावाला प्रश्न पडला. रहिमाला विचारले असता, रहिमा खरं काय ते सांगत नव्हती. त्यानंतर सियालच्या भावाने आपला भाऊ हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

'असा' केला तपास

त्यानंतर पोलिसांनी सियालचं घर गाठलं आणि तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांसह फॉरेन्सिक लॅबचं पथकंही तिथं पोहोचलं होतं. त्यावेळी त्यांनी सियालला पुरलेल्या ठिकाणची जागा खोदण्यास सुरूवात केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

हेही वाचा : प्रसिद्धीसाठी विकृतीचं टोक! रिल्सस्टार्स तरुणी व्हिडिओ शूट करून करायच्या अश्लील चाळे, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास केल्यानंतर सांगितलं की, या प्रकरणात मृत पतीची पत्नी रहिमाच नसून तिच्यासोबत अन्य कोणीतरी आहे. कारण पतीला मारून मृतदेह जमिनीत पुरण्याचं काम एकची महिला करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना महिलेमागे आणखी कोणी तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणात रहिमाला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp