'तुझ्या कामाच्या शिफ्टमुळे मी एकटा पडलो...', प्रियकराला आला राग; तरुणीसोबत जे घडलं ते ऐकून तुमचाही उडेल थरकाप!
Crime News : प्रियकराने आपल्याच प्रेयसीची हत्या केली आहे. अगदी शुल्लक कारणावरून प्रेयसीची हत्या केल्याचं प्रकरण आता उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रियकराने आपल्याच प्रेयसीची केली हत्या

कारण आलं समोर
Crime News : प्रियकराने आपल्याच प्रेयसीची हत्या केली आहे. अगदी शुल्लक कारणावरून प्रेयसीची हत्या केल्याचं प्रकरण आता उघडकीस आलं आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर तिने तीन वेगवेगळ्या चाकूंनी वार करून तिची हत्या केली. तो एवढ्यावरच न थांबता त्याने प्रेयसिचे मुंडकं छाटलं. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या आईला प्रेयसी जिवंत असल्याचे सांगितलं. जाणून घेऊयात हा भयानक घटनाक्रम काय आहे. ही घटना स्कँटलंडमधील ईस्ट किलब्राईड येथील आहे, या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आरोपी हा पोस्टमन इवान मेथवेननं त्याच्या 21 वर्षीय प्रेयसी फिनिक्स स्पेन्सर -हॉर्नची हत्या केली.
हेही वाचा : पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर
नेमकं काय घडलं?
तिच्या कामाच्या शिफ्टमुळे त्याला एकटेपणा जाणवू लागला होता. हत्येच्या रात्री मेथवन हा त्याच्या प्रेयसीच्याच फ्लॅटवर होता. तेव्हा दोघांनीही एकत्रपणे जेवणाची ऑर्डर दिली. तेव्हाच आरोपीने त्याच्या प्रेयसीला असंही सांगितलं की, तुझी शिफ्ट अशी आहे की ज्यामुळे मला एकटेपणा जाणवतो. प्रेयसीला वाटलं की तो तिच्या मनातील सल सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तिने प्रियकराचं मन ओळखलं आणि त्याचं म्हणणं निटसं ऐकलं नाही. संबंधित घटनेचे वृत्त मिरर. को. युके या वृत्तमाध्यमाने प्रसारीत केले होते. ही घटना 16 नोव्हेंबर 2024 रोजी घडली होती.
अहवालानुसार, आरोपी प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर तीन वेगवेगळ्या चाकूंनी सुमारे एक दोन नाही,तर 22 वेळा वार केले. त्यानंतर तिचा छळ केला आणि तिचं मुंडकं छाटलं. या गुन्ह्यासाठी, आरोपी प्रियकर मेथवेनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात ग्लसगो उच्च न्यायालयात सांगितले की, दोघांनीही त्यांच्या फ्लॅटवर एकत्र जेवण मागवले होते. रात्री फिनिक्सने त्याच्या मैत्रिणीला मेसेज केला होता तेव्हा ते जेवण करत होते. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास फिनिक्सवर हल्ला करण्यात आला असता, त्याने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली.
घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी आरोपीने प्रेयसीचा मोबाईल घेतला आणि आईला मेसेज करून सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगितलं. काही दिवसानंतर आरोपीने पोलिसांना स्वत: फोन करून त्याने प्रेयसीची हत्या केल्याचं सांगितलं. कोकेन, अल्कोहोल आणि सिरॉइड्सच्या सेवनाने हा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर
पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली असता, भयानक स्थितीत मृतदेह पडला होता. पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या छातीवर वार करण्यात आल्याची माहिती समोर आली. तरुणीच्या आईला या घटनेची माहिती मिळताच तिच्या पायाखालीची जमीन सरकली.