अनैतिक संबंधांसाठी आईने घेतला चिमुकलीचा जीव, मुलीच्या मृतदेहासमोरच महिलेने पार्टनरसोबत केलं एन्जॉय!
Crime news : महिलेनं आपल्याच लेकीच्या छाताडावर उभं राहून मुलीचा केला खून. कारण ऐकूण तुम्हीही चक्रावून जाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आईनेच प्रियकरासाठी लेकीचा केला खून

मन हेलावून टाकणारी घटना आली समोर
Crime news : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील केसरबाग येथील खंदरी येथे मोठं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. एका रोशनी नावाच्या महिलेचा शाहरूख नावाच्या तरुणाशी 10 वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांना एक 7 वर्षांची सायनारा नावाची एक मुलगी देखील होती. तर रोशनी ही डान्स बारमध्ये डांन्सर म्हणून काम करते. तिचे गेल्या 4 वर्षांपासून तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिने आपल्या कुटुंबात राहणाऱ्या नातेवाईकांवर बलात्काराचा खोटा आरोप लावल्याने पोलिसांनी त्यांना तुरुंगात टाकले. त्यानंतर तिला आपल्याच घरामध्ये सर्व रान मोकळं दिसू लागलं होतं. त्यानंतर तिनं आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीतच ठेवलं. त्याला अनेकदा मारहाणही केली. त्यानंतर तिनं घर सोडलं आणि ती तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन संबंधात राहू लागली होती.
हेही वाचा : मुंबई: पाळणाघरातील चिमुकलीला मोबाइल दिला अन् बेडरूममध्ये नेऊन... 44 वर्षीय नराधमाचं गलिच्छ कृत्य
15 जुलैच्या मध्यरात्री 3 वाजता रोशनीने पोलिसांना संपर्क करत सांगितलं की, नवऱ्याने आपल्या लेकीची हत्या केली. रोशनीने संपर्क केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा आरोपीने दोघांच्या भांडणात मुलीला मारलं आणि त्याने पळ काढला. पोलिसांनी लहान मुलीचं प्रेत पाहिलं असता, त्या प्रेताला दुर्गंधी येत होती. प्रेतावर किटाणू फिरू लागले होते. पोलिसांनी मुलीच्या हत्येबाबतचा रोशनीवर संशय व्यक्त केला.
जेव्हा पोलिसांनी रोशनी आणि तिचा प्रियकर उदित जयस्वालशी घडलेल्या घटनेची चौकशी केली असता, सत्य बाहेर आलंच. ते म्हणाले की, जयस्वालची आणि रोशनीची गेल्या 4 वर्षांपासून मैत्री आहे. तो डान्सबारला जायचा आणि तेव्हा तो रोशनीचा डान्स पाहून तिच्यावर फिदा झाला. त्यानंतर दोघेही जवळ आले आणि लिव्ह इनमध्ये राहू लागले होते.
नेमकं काय घडलं होतं?
उदित म्हणाला की, रोशनीचा नवरा हा आणि तिच्या नातेवाईकांनी आमच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आम्ही प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार, रोशनीचा मेहुणा, सासू आणि दोन्ही वहिणींना तुरुंगात पाठवण्यात आले. 13 जुलै रोजी रोशनीने आणि तिचा प्रियकर उदितने त्यांची 7 वर्षांची मुलगी सायनारा हिचा गळा आणि तोंड दाबून हत्या केली. रोशनीने आपल्या लेकीच्या पोटावर पाय ठेवले. त्यानंतर तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. तिने तिचा प्रियकर उदितच्या कपड्याने रक्त साफ केलं. त्यानंतर तिने मृतदेह बेडमध्ये रिकाम्या जागेत ठेवला.
हेही वाचा : विकृतीची परिसीमा! लग्नाचं आमिष दाखवून मुलीचं केलं लैंगिक शोषण, नंतर सोशल मीडियावर फोटो केले शेअर
दरम्यान, रोशनीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा मृतदेहाला दुर्गंध येऊ लागाला तेव्हा तिने आणि उदितने मृतदेह बेडमधून बाहेर काढला आणि एसीसमोर ठेवला. त्यानंतर त्यांनी शरीरावर परफ्यूम मारून येणारी दुर्गंधी अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घर फिनॉलने धुतले. त्यानंतर मृतदेहासमोर मद्यपान पार्टीसुद्धा केली. त्यानंतर रोशनी उदितनेही ड्रग्स घेतले. रात्री जेव्हा तिला जाग आली तेव्हा त्यांनीच पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता या प्रकरणाचा भांडाफोड झाला. यानंतर पोलिसांनी रोशनी आणि तिच्या प्रेयसीला आपल्या ताब्यात घेतलं.