मुंबई: पाळणाघरातील चिमुकलीला मोबाइल दिला अन् बेडरूममध्ये नेऊन... 44 वर्षीय नराधमाचं गलिच्छ कृत्य
Mumbai Crime : 5 ते 6 वर्षांच्या लहान मुलींवर आरोपीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आता दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील दिंडोरीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

44 वर्षीय आरोपीने लहान मुलीचं केलं लैंगिक शोषण
Mumbai Crime : मुंबईतील दिंडोरीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 44 वर्षीय आरोपीने पाळणाघरातील लहान मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 5 ते 6 वर्षांच्या लहान मुलींवर आरोपीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आता दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
हेही वाचा : Mumbai Tak Baithak 2025: 'त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करूच..' CM फडणवीसांची माघार नाहीच.. ठणकावून सांगितलं!, ठाकरे बंधूंना थेट आव्हान?
मुलीला मोबाईल द्यायचा नंतर बेडरूममध्ये न्यायचा अन्...
या घडलेल्या घटनेनुसार, आरोपी हा घरात ट्युशन घेतो, तसेच त्याचं पाळणाघर देखील आहे. त्याच्या पाळणाघरात अनेक लहान मुलं येत असतात. आरोपीच्या घराच्याच शेजारी 7 वर्षांची लहान मुलगी राहते. ती आरोपीच्या घरी ट्युशनसाठी यायची , त्यानंतर आरोपी तिला बेडरूममध्ये घेऊन जायचा असा आरोप आहे. यानंतर मुलीला गेम खेळण्यासाठी मोबाईल द्यायचा आणि नंतर कोवळ्या जीवावर विनयभंग करायाचा.
जेव्हा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित प्रकरणाची स्थिती जाणून घेऊन पोलिसांनी खोलवर तपास सुरू केला असता, त्याने 5 ते 6 लहान मुलींसोबत अशाप्रकारे विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला दिंडोशी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आहे. त्यानंतर संबंधित आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडीत सुनावनी करण्यात आली. दरम्यान, आरोपीने अश्या किती मुलींसोबत असं कृत्य केलंय? असा प्रश्न पोलिसांना उपस्थित केला आहे.
लैंगिक अत्याचाराची मुंबईतील दुसरी घटना
दरम्यान, मुंबईत आणखी एक घटना उघडकीस आलेली आहे. सात रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलीवर एक पोलीस कॉन्स्टेबलने लैंगिक शोषण केलं आहे. ही घटना शनिवारी 12 जुलै रोजी, आग्रीपाडा पोली, ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
संबंधित प्रकरणात घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलगी ही तिच्या घराच्या खाली प्रसाद घेण्यासाठी आली होती, त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल तिथे उभा होता. तेव्हा त्याने मुलीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ती मुलगी आपल्या घरी जाण्यासाठी लिफ्टकडे गेली असता, इतक्याच पोलीस कॉन्स्टेबल तिला पहिल्या पायरीवर ओढत नेलं. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेनं तातडीने घरी जाऊन आपल्या आईला घडलेली घटना सांगितली.
हेही वाचा : विकृतीची परिसीमा! लग्नाचं आमिष दाखवून मुलीचं केलं लैंगिक शोषण, नंतर सोशल मीडियावर फोटो केले शेअर
त्यानंतर पीडितेच्या आईने आग्नीाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जिथं ही घटना घडली तिथं जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीला ताब्यात घेतलं. दरम्यान, पोलीस संबंधित घटनेचा पुढील तपास करत आहेत.