प्रसिद्धीसाठी विकृतीचं टोक! रिल्सस्टार्स तरुणी व्हिडिओ शूट करून करायच्या अश्लील चाळे, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

crime news : रिल्सस्टार्स परी आणि मेहक नावाच्या दोन तरुणींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. संभळ पोलिसांनी मेहक आणि परीविरोधात त्यांचा कॅमेरामन मेहक परीसह इतर चौघांना अटक केली आहे. 

ADVERTISEMENT

crime news reelsstars young women shoot videos
crime news reelsstars young women shoot videos
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रिल्सस्टार्सने प्रसिद्धीसाठी सर्वच अब्रु गहाण टाकली

point

प्रसिद्धीच्या नादात रिल्सस्टार्स गोत्यात

Crime News : सोशल मीडियावर अनेक रिल्सस्टार्सने प्रसिद्धीसाठी सर्वच अब्रु गहाण टाकली आहे. रिल्सस्टार्स प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी काय करतील याचा नेम नाही. मात्र, प्रसिद्धीच्या नादात त्यांनी केलेल्या कृत्यामुळे ते अनेकदा गोत्यातही येतात. आता अशीच एक घटना समोर आलेली आहे. उत्तर प्रदेशातील संभळमध्ये रिल्सस्टार्स परी आणि मेहक नावाच्या दोन तरुणींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. संभळ पोलिसांनी मेहक आणि परीविरोधात त्यांचा कॅमेरामन मेहक परीसह इतर चौघांना अटक केली आहे. 

हेही वाचा : दारू पितो म्हणून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार

व्हिडिओ कंटेटमध्ये बोलायची अश्लील 

गेल्या काही दिवसांपासून मेहक आणि परीचे व्हिडिओ-रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या रिल्समध्ये ती शिवीगाळ करायची, अश्लील बोलायची आणि अश्लील हावभाव करायची. तिचे हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामुळे पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतलं. 

तपासातून असे समोर आले की, दोघांनीही सोशल मीडियावर मेहकपरी 143 असं नाव असलेलं अकाउंट तयार केले होते. जिथं ते त्यांचे रिल्स  व्हिडिओ आणि अपलोड करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला. 

हेही वाचा : पुणे तिथं काय उणे! फिर्याद दाखल करणाऱ्यांवर कोयत्याने सपावर वार, नेमका वाद काय?

संबंधित प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक केली. मेहक आणि परीसोबत हिना नावाच्या एका मुलीलाही या प्रकरणात अटक करण्यात आली. याचवेळी कॅमेऱ्यामन आलमलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp