मेव्हणीच्या प्रेमात वेडापिसा झाला भाऊजी! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दोन्ही मुलांचा गळा कापला अन् जंगलात..

मुंबई तक

Madhya Pradesh Shocking Crime News : मध्यप्रदेशच्या सिवनी शहरात सुभाष वार्ड परिसरात 6 आणि 9 वर्षांच्या दोन भावांचं अपहरण करून त्यांचा गळा कापला.

ADVERTISEMENT

फतेहाबाद टोहाणामध्ये पत्नी आणि प्रियकराची हत्या करून पतीने खळबळ उडवली, प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट
फतेहाबाद टोहाणामध्ये पत्नी आणि प्रियकराची हत्या करून पतीने खळबळ उडवली, प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेव्हणीच्या प्रेमात पडलेल्या भाऊजींनी दोन मुलांची केली हत्या

point

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

point

त्या गावात नेमकं काय घडलं होतं?

Madhya Pradesh Shocking Crime News : मध्यप्रदेशच्या सिवनी शहरात सुभाष वार्ड परिसरात 6 आणि 9 वर्षांच्या दोन भावांचं अपहरण करून त्यांचा गळा कापला. हत्येच्या या घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 24 तासांच्या आतच या हत्याकांडचा उलगडा केला आहे. पोलिसांनी या हत्येचा खुलासा करत म्हटलंय, मुलांच्या काकानेच एका व्यक्तीसोबत मिळून त्यांचं अपहरण केलंत. नंतर सायकल देण्याच्या बहाण्याने जंगलात जाऊन चाकूने दोघांचाही गळा कापून हत्या केली.

पोलिसांनी या हत्येमागचं कारणही शोधलं आहे. पोलिसांनी म्हटलंय की, आरोपी मुलांची आई, जीचं त्याच्यासोबत मेव्हणीचं नातं होतं. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. आरोपी त्याच्या मेव्हणीच्या प्रेमात वेडापीसा झाला होता. त्याच्या प्रेमकहाणीच्या प्रवासात ही दोन मुलं अडथळा बनत होती. त्यामुळे त्याने एका मित्राला सोबत घेऊन मुलांना सायकल देण्याचा बहाणा करून जंगलात नेलं. त्यानंतर चाकूने गळा कापून त्यांची हत्या केली. आरोपीने मुलांचा मृतदेह दगडांच्या खाली ठेवला आणि ते तिथून फरार झाले.    

हे ही वाचा > VIDEO: विधानसभेच्या परिसरात तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!

त्या जंगलात काय घडलं? पोलीस तपासात आली धक्कादायक माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं मंगळवार संध्याकाळपासून बेपत्ता होते. मुलांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, काही ठिकाणी मुलं असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर 13 किमी दूर असलेल्या एका जंगलात असलेल्या दरीत एका मुलाचा मृतदेह सापडला. तर एका मोठ्या खड्ड्यातून दुसऱ्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दोन्ही मुलांचा मृतदेह जिल्हा मुख्यालयापासून 12 किमी दूर असलेल्या सिवनी-कटंगी मार्गावरील जंगलात सापडलं.

हे ही वाचा >> 40 वर्षीय विवाहित शिक्षिका 'यासाठी' 16 वर्षांच्या मुलासोबत ठेवायची शरीरसंबंध? 'तो' अहवाल आला समोर!

मृतांच्या आईने पोलिसांना सांगितलं की, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ती घरी काम करत होती. दोन्ही मुलं त्यावेळी घरीच होती. काम केल्यानंतर मी जेव्हा रात्री 8 वाजता घरी पोहोचली, तेव्हा दोन्ही मुलं घरात नव्हती. रात्री एकरा वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. पण जेव्हा ते घरी आले नाही, तेव्हा पोलिसांना याबाबत कळवलं. दरम्यान, मुलांच्या आईने आरोपीवर संशय व्यक्त केला होता. तिने पोलिसांना सांगितलं की, यापूर्वीही आरोपीने अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, महिलेचं 8 वर्षांपूर्वी पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. महिला तिच्या दोन्ही मुलांना घेऊन सिवनीला आली होती. सिवनीत ती एक भाड्याच्या दुकानात राहत होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp