Pune News : पुणकरेांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे स्थानकावरून लवकरच चार नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहेत. यामुळे पुणेकरांना आता सहजपणे कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार होईल. सध्या पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळी येथे जाण्यासाठी दोन वंदे भारत धावणार आहेत. आता यात आणखी एका चार वंदे भारत रेल्वेंचा समावेश करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?
पुणे जंक्शन हे एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेसचं केंद्र बनलेलं आहे. प्रत्यक्षात, नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ही पुण्याहून शेगांव, बेळगाव, बडोदा आणि सिकंदराबाद येथे जाण्यासाठी लवकरच सज्ज होतील. यामुळे पुण्यातील लोक काही वेळातच पोहोचतील. यामुळे वायफळ होणारा खर्च वाचण्याची शक्यता आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे
पुणे - शेगांव वंदे भारत एक्सप्रेसचा नवीन मार्ग हा पुणे-शेगाव असेल. याच पुणे-शेगाव रेल्वे मार्गाच्या दरम्यान दौंड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना हीच रेल्वे स्थानक असतील, अशी शक्यता आहे.
पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेसचा नवीन दुसरा मार्ग हा पुणे-वडोदरा असेल. या रेल्वे मार्गादरम्यान लोणावळा, पनवेल, वापी आणि सुरत ही रेल्वेची स्थानकं असतील.
पुणे सिकंदराबाद वंदे भारत रेल्वेचा चौथा मार्ग हा पुणे-बेळगाव असेल. या मार्गाच्या दरम्यान सातारा, सांगली आणि मिरज ही रेल्वे स्थानकं असतील.
या वंदे भारत एक्सप्रेच्या गाडयांच्या तिकीटांची किंमत ही 1,500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान असू शकतात. तर या वाहनांमुळे रेल्वेचा प्रवास वेळ 9 तासांवरून 6-7 तासांपर्यंतचा कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा : सेल्फी घेणं जीवावर बेतलं, तरुणाचं करिअर सुरु होण्यापूर्वीच संपलं, थरारक व्हिडिओ आला समोर
यामुळे राज्य हे इतर राज्याशी लवकर जोडले जाईल. वंदे भारतसारख्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास हा सुकर होईल, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. याचसोबत, यामुळे राज्याशी जोडण्यात आलेल्या भागात पर्यटनाला चांगली चालना मिळेल आणि पुण्याच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
