Husband And Wife Clash Viral News : दिल्लीच्या निहाल विहारमध्ये राहणाऱ्या विकास नावाच्या तरुणाने लाईव्ह व्हिडीओ करून स्वत:चं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ क्लिपमध्ये त्याने आरोप केला की, त्याच्या पत्नीनं त्याला आणि चार वर्षांच्या मुलाला कर्जामुळे सोडलं आणि एका शकीब नावाच्या व्यक्तीसोबत राहायला लागली. यामुळे तो खूप नैराश्यात होता. तरुणाने म्हटलं की, आता माझं सर्व कर्ज संपलं आहे. पण जगण्याची इच्छा नाहीय. त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे.
ADVERTISEMENT
रिपोर्टनुसार, विकास असं मृत तरुणाचं नाव आहे. विकास निहाल विहार परिसरात त्याची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासोबत राहत होता. विकास छोटा-मोठा धंदा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. याचदरम्यान त्याच्यावर कर्जही झालं होतं. कर्जामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडलं आणि ती माहेरी निघून गेली. त्याची पत्नी काही दिवस माहेरी राहिली. त्यानंतर तिचं अफेअर शकीब नावाच्या तरुणासोबत सुरु झालं.
हे ही वाचा >> VIDEO: विधानसभेच्या परिसरात तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!
आईच्या आठवणीत रडायचा मुलगा
विकासने म्हटलं की, पत्नीने त्याला आणि चार वर्षांच्या मुलाला आधीच सोडलं होतं. त्यानंतर पत्नीने तिची आई आणि बहिणीचं घर सोडलं आणि शकीबसोबत राहू लागली. विकासने म्हटलं की, त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने त्याचं ऐकलं नाही. मुलगा आईच्या आठवणीत खूप रडायचा. त्याचं दु:ख तो पाहू शकला नाही. त्यानंतर त्याने कमाई करून कर्ज फेडलं.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: मध्य रेल्वेकडून 'गणपती स्पेशल ट्रेन'ची घोषणा! मात्र काही तासांतच प्रवाशांना मोठा धक्का...
चार वर्षांच्या मुलाला आई-वडिलांकडे सोपवलं
विकासने लाईव्ह व्हिडीओत म्हटलं की, जर माझा आज मृत्यू झाला, तर माझ्या मुलाला आई-वडील आणि बहिणीकडे सोपवा. पत्नीच्या आईकडे देऊ नका. विकासने जीवन संपवल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस विकासच्या पत्नीचा शोध घेत आहेत. जेणेकरून आत्महत्येमागची कारणं उघड होतील.
ADVERTISEMENT
