Maharashtra Weather : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार राज्यातील हवामानाचा 18 जुलै 2025 रोजीचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवलेली आहे. तर जाणून घेऊयात हवामान विभागाच्या अंदाजाबाबतची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : VIDEO: विधानसभेच्या परिसरात तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!
कोकणातील मान्सून स्थिती :
राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगडसाठी ‘यलो’ किंवा ‘ऑरेंज’ अलर्ट असण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील शक्यतो घाटमाथ्यावर (पुणे, सातारा) मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुण्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पुणे आणि साताऱ्यात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे तिथं काय उणे! तीन तासात एकाच ठिकाणी दहा अपघात, सीसीटीव्हीची साक्ष अन् व्हिडिओ व्हायरल
मराठवाडा आणि विदर्भातील मान्सून स्थिती :
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा मान्सून असेल. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होणार आहे. तसेच विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल होईल अशी हवमान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तसेच ढगाळ वातावरण आणि वाऱ्य़ाचा वेग मध्यम स्वरुपाचा असेल असा हवमान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
