पुणे-पिंपरी चिंचवडमधील जोडणारा नवा सेतू वाहतुकीसाठी खुला, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलं होतं उद्घाटन

मुंबई तक

• 06:45 PM • 08 Apr 2026

Pune news : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुळा मुठा नदीवरील पूर आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. एकेकाळी याच पुलाचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले होते. सांगवी-बोपोडी पुलाचे 'सरकार शितोळे सेतू' असे नामकरण करण्यात आल्याची माहिती आहे.

Pune news

Pune news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'सरकार शितोळे सेतू'चे अजितदादांनी केले होते उद्घाटन

point

सरकार शितोळे सेतू पूल सुमारे 760 मीटर लांबीचा

पुण्याची गोष्ट : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुळा मुठा नदीवरील पूर आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. एकेकाळी याच पुलाचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले होते. सांगवी-बोपोडी पुलाचे 'सरकार शितोळे सेतू' असे नामकरण करण्यात आल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता, पण आता या मार्गाचे काम पूर्ण झाले असून आता वाहतूक सेवा पुन्हा एकदा सुरु झाली. हा पूल स्थानिकांसह इतर लोकांसाठी आकर्षणासाठीचे केंद्र अशी ओळख ठरत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्रपूर: मित्राच्या वरातीत DJ च्या तालावर थिरकला, पुढच्या मिनिटात तरुणाचा मृत्यू

'सरकार शितोळे सेतू'चे अजितदादांनी केले होते उद्घाटन

संबंधित पूल हा पुणे आणि पिंपरी-चिंचडवड शहरांना जोडणारा महत्त्वाचा पूल अशी ओळख आहे. याच पुलाचे  5 जानेवारी 2022 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. तर 14 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजितदादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. 

हे ही वाचा : तरुण महिलांची वाळवत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरायचा, तेच वस्त्र परिधान करून कॅमेऱ्यासमोर अश्लील...

सरकार शितोळे सेतू पूल सुमारे 760 मीटर लांबीचा

सरकार शितोळे सेतू पूल सुमारे 760 मीटर लांबीचा असल्याची माहिती आहे. या पुलासाठी 40 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला होता. पुलावरील कमान ही आकर्षक असून त्या कमानीची 26 मीटर उंची आहे, तर वजन हे 650 टन एवढं आहे.