चंद्रपूर: मित्राच्या वरातीत DJ च्या तालावर थिरकला, पुढच्या मिनिटात तरुणाचा मृत्यू
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आनंद आणि उत्साहाच्या वातावरणाचे दुःखात रुपांतर झाले. एका कुटुंबावर भर लग्नातच भलं मोठं संकट कोसळलं. गोंडपिप्परी तालुक्यातील फुरडीहेटी गावात, लग्नसमारंभात डीजेच्या तालावर नाचताना 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राच्या लग्नात डिजेच्या गाण्यावर नाचताना मित्राचा अंत
उत्साहाच्या वातावरणात अचानक बदल
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आनंद आणि उत्साहाच्या वातावरणाचे दुःखात रुपांतर झाले. एका कुटुंबावर भर लग्नातच भलं मोठं संकट कोसळलं. गोंडपिप्परी तालुक्यातील फुरडीहेटी गावात, लग्नसमारंभात डीजेच्या तालावर नाचताना 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. लग्नाचा आनंद क्षणार्धात शोकात बदलला.
हे ही वाचा : बीड : अंबाजोगाईत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चाकाखाली चिरडलं, भीषण अपघातात बँक अधिकाऱ्याचा अंत
मित्राच्या लग्नात डिजेच्या गाण्यावर नाचताना मित्राचा अंत
मृत तरुणाचे नाव अल्पशे दहागवकर (वय 25) अशी ओळख पटली. अल्पेश उत्साहाने मित्राच्या लग्नात उपस्थित राहिला होता. संपूर्ण गाव आनंद आणि जल्लोषानं भरलेलं होतं. वऱ्हाडी मंडळी डिजेच्या गाण्यावर नाचत होते. याच आनंदाच्या क्षणात एक भीषण अपघात झाला.
उत्साहाच्या वातावरणात अचानक बदल
डिजेच्या गाण्यावर अल्पशे नाचताना अचानकपणे जमिनीवर कोसळला. सुरुवातीला लोकांना वाटले की, तो मस्करी करतो किंवा त्याला दम भरल्याचा समाज निर्माण झाला, पण उत्साहाच्या वातावरणात अचानक बदल निर्माण झाला. तो बराच वेळी स्तब्ध स्थितीत राहिला असता, अनेकांना गडबड असल्याचा संशय आला. मात्र, सत्य समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
हे ही वाचा : तरुण महिलांची वाळवत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरायचा, तेच वस्त्र परिधान करून कॅमेऱ्यासमोर अश्लील...
अल्पेशचे मित्र दु:खाने व्याकूळ झाले, त्याला गोंडपिप्री येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता, नंतर मृत घोषित केले. या घटनेनं कुटुंबियांच्या पायाखालील जमीन सरकून गेली. संबंधित प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार, हा हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जातेय.









