पुण्याची गोष्ट : शिरुरमध्ये भररस्त्यात महिलेची प्रसूती, डॉक्टर अन् नगरसेविका झाल्या देवदूत

मुंबई तक

25 Apr 2026 (अपडेटेड: 25 Apr 2026, 07:08 PM)

Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात एक महिला प्रसूतीच्या कळा सोसत मृत्यूशी झुंज देत होती. तर दुसऱ्या बाजूला माणुसकीचे हात मदतीसाठी धावून आले. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि डॉक्टर असलेल्या नगरसेविकाच आता महिलेच्या मदतीला धावून आल्या आहेत. अशावेळी महिलेनं एका बाळाला जन्म देत जीवदान दिले.

Pune News

Pune News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

साड्यांचा आडोसा धरत महिलेची प्रसूती

point

नगरसेविका पूजा पोटावळे यांनी महिलेची केली प्रसूती

पुण्याची गोष्ट : रायचंद शिंदे - पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात एक महिला प्रसूतीच्या कळा सोसत मृत्यूशी झुंज देत होती. तर दुसऱ्या बाजूला माणुसकीचे हात मदतीसाठी धावून आले. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि डॉक्टर असलेल्या नगरसेविकाच आता महिलेच्या मदतीला धावून आल्या आहेत. अशावेळी महिलेनं एका बाळाला जन्म देत जीवदान दिले. ही घटना शिरुर शहराच्या जोशीवाडी भागातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : काका अशी ओळख सांगून, 6 वर्षीय मुलीला घरात फसवून नेले नंतर नको तेच... लाज आणणारी घटना

साड्यांचा आडोसा धरत महिलेची प्रसूती

परिस्थिती इतकी भीषण होती की, ज्यामुळे तिला पुढील काही मिनिटांचा प्रवास करणे अशक्य झालं होतं. अशा स्थितीत घटनास्थळी काही महिलांचे हात मदतीसाठी सरसावले. रस्त्याच्यानजीक असलेल्या एका झाडाखालील परिसरात महिलांनी तातडीने एकत्रित येत, साड्यांचा आडोसा धरत महिलेची प्रसूती केली. स्थानिक पत्रकाराने या घटनेची माहिती देताच, माहिती वैद्यकीय व्यवसायिक आणि शिरुरच्या नगरसेविका डॉ. सुनिता पोटे यांनी दिली. 

नगरसेविका पूजा पोटावळे यांनी महिलेची केली प्रसूती

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डॉक्टरांनी क्षणाचा कसलाही विलंब न करता धाव घेतली आणि कठीण परिस्थिती लक्षात घेत प्रसूती पार पाडली. तेव्हा नगरसेविका पूजा पोटावळे यांनी कसा मागील पुढील कसलाही विचार न करता परिस्थिती हाताळली. प्रसुतीदरम्यान बाळाचा आवाज येत नसल्याने काही वेळ चिंता होती, अशा स्थितीत डॉ. सुनिता पोटे यांनी वैद्यकीय तंत्राचा वापर करत बाळ रडू लागले, ही एक सकारात्मक बाब होती. 

हे ही वाचा : 16 वर्षीय मुलाचं पोट फाडून गळा चिरला, भर लग्नसोहळ्यात रक्ताचा सडा, मृतदेह शेतात फेकला अन्... भयंकर कांड

अशा स्थितीत आई-बाळ दोघेही सुखरूप आहेत. हा प्रसंग बघताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, अधुनिक काळात आपण डिजिटल उपकरणांचा लाभ घेत असलो, तरीही माणुसकी अद्यापही जिवंत असल्याचे हे एक उदाहरण आहे.