पुण्याची गोष्ट : पुणेकरांनो महिनाभर हा पूल राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करू शकता वापर

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. शहरातील होय, ज्याला 'झेड ब्रिज' म्हणतात. याच पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार असून महिनाभर काम बंद राहणार.

Pune News

Pune News

मुंबई तक

• 06:44 PM • 11 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेचं मोठं पाऊल

point

'या' पर्यायी मार्गाचा करू शकता वापर

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. शहरातील डेक्कन आणि पेठ भागांना जोडणारा अगदी महत्त्वाचा पूल म्हणजे स्वर्गीय काकासाहेब गाडगीळ पूल होय, ज्याला झेड ब्रिज म्हणतात. याच पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार असून महिनाभर काम बंद राहणार असल्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिटनंतर याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, 10 एप्रिल ते 9 मे 2026 या कालावधीत पुलावर रात्रीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर: हुंड्याच्या छळाला कंटाळून पीडितेनं ब्लँकेटनं गळफास घेत संपवलं जीवन; सासरच्यांकडून सुनेचा हुंडाबळी

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेचं मोठं पाऊल

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेनं दुरूस्तीच्या कामासाठी रात्रीच्या वेळीचं नियोजन केलं. रात्री 11 ते सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुलावरील वाहतूक करता येणार नाही. पुलाचे बेअरिंग्ज बदलले जाणार आहे. जिल्हाधिकारी जीतेद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार, एकूण दुरुस्ती पुलांच्या यादीत 17 पुलांची यादी करण्यात आली, ज्यात 'झेड ब्रिज'चा समावेश आहे.  

'या' पर्यायी मार्गाचा करू शकता वापर

रात्रीच्या वेळी डेक्कनकडून पेठ विभागात किंवा पेठकडून डक्कनकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. जसे की, छत्रपती संभाजी (लाकडी पूल), एकूण परिस्थिती पाहून भिडे पुलाचा वापर करावा. तसेच नारायण पेठ असे पर्यायी मार्ग वापरावा.

हे ही वाचा : बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र वापरुन कुणाल कामराचे हक्कभंग समितीला स्पष्टीकरण, एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं

पुढे अधिकारी म्हणाले की, पुलाची दुरुस्ती करणे हे गरजेचे आहे. पुलाची सुरक्षा व्हावी आणि तो पूल दिर्घकाळ टिकावा यासाठी दुरुस्ती अनिवार्य आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि रात्रीच्यादरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती  दिनकर गोजारे, प्रमुख, प्रकल्प विभाग, पुणे महानगरपालिका यांनी दिली होती.